Shambhuraj Desai Bungalow : पालकमंत्र्यांच्या घरासमोर दाम्‍पत्‍याचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; पोलिसांनी घेतले ताब्‍यात

Karad, Sangali कऱ्हाड, सांगली येथील गुंड आणून संपूर्ण कुटुंबाला जिवंत मारण्‍याची धमकीही देण्‍यात आल्‍याचे लक्ष्‍मी डागा यांचे म्‍हणणे आहे.
Police Arrest couple Near Shambhuraj Desais House
Police Arrest couple Near Shambhuraj Desais HousePramod Ingale, Satara
Published on
Updated on

Satara Crime News : गुटखा व्‍यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितल्‍याची तक्रार करूनही कारवाई होत नसल्‍याच्‍या कारणास्‍तव आज दुपारी सदर बझारमधील लक्ष्‍मी प्रकाश डागा, प्रकाश डागा यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या पोवई नाका येथील निवासस्‍थानासमोर आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी त्‍या दोघांना ताब्‍यात घेतले आहे.

सातारा शहरातील Satara सदर बझारमध्‍ये लक्ष्‍मी डागा या पती प्रकाश डागा व इतर कुटुंबीयासमवेत राहण्‍यास आहेत. रविवार पेठेतील जुनी भाजी मंडईत राहणारा साहिल कोलकर, सलीम कोलकर, क्षमाप्‍पा कोलकर हे प्रकाश डागा व इतर कुटुंबीयांकडे दोन लाखांची खंडणी Ransom मागत होते.

त्‍यास नकार दिल्‍यानंतर गुटखा विक्री करा, तुम्‍हाला जास्‍तीचे पैसे देतो, असे म्‍हणत त्‍या तिघांकडून प्रकाश डागा यांच्‍यावर दबाव टाकण्‍यात येत होता. त्‍यास नकार दिल्‍याने कोलकरांकडून खंडणीच्‍या कारणास्‍तव प्रकाश डागा व इतरांना मारहाणही झाली होती. मारहाण करतानाच कऱ्हाड, सांगली येथील गुंड आणून संपूर्ण कुटुंबाला जिवंत मारण्‍याची धमकीही देण्‍यात आल्‍याचे लक्ष्‍मी डागा यांचे म्‍हणणे आहे

याबाबतचा तक्रार अर्ज लक्ष्‍मी डागा यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केला होता. अर्ज करूनही पोलिसांनी दखल न घेतल्‍याने लक्ष्‍मी डागा, प्रकाश डागा यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर शुक्रवारी आत्‍मदहनाचा इशारा दिला होता. यानुसार त्‍या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता. Maharashtra Crime News

Police Arrest couple Near Shambhuraj Desais House
Satara Loksabha News : उदयनराजेंविरोधात शरद पवार देणार खमक्या उमेदवार

दुपारी बाराच्‍या सुमारास लक्ष्‍मी डागा, प्रकाश डागा यांनी त्‍या ठिकाणी येत अंगावर ज्‍वलनशील पदार्थ ओतून स्‍वत:ला पेटवून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. हे लक्षात येताच पोलिसांनी त्‍या दोघांना ताब्‍यात घेत त्‍ त्यांच्या अंगावर पाण्‍याचा मारा केला. त्‍या दोघांना ताब्‍यात घेत नंतर जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयात नेण्‍यात आले. याची नोंद घेण्‍याचे काम रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्‍यात सुरू होते.

Edited By : Umesh Bambare

Police Arrest couple Near Shambhuraj Desais House
Manoj Jarange Patil Pune News : "२४ तारखेपर्यंत शांत राहू, नंतर भूमिका स्पष्ट करणार; जरांगेंचा पुनर्रुच्चार : आज तोफ धडाडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com