Satara : शिक्षक बँकेत तिरंगी लढत; शिवाजीराव, संभाजीराव गट विरोधात लढणार

शिक्षक बँकेच्या इतिहासात History of Teachers Bank प्रथमच तिसरे पॅनेल Third Pannel पडले आहे. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन Swabhimani Parivartan aghadi आघाडीने १२ जागांच्या माध्यमातून संघ, समितीपुढे आव्हान निर्माण केले आहे.
Shikshak Bank Satara
Shikshak Bank Satarasarkarnama
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २७४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षक संघाचे २१, प्राथमिक शिक्षक समितीचे २१, स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीचे १२ व पाच अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने तिरंगी लढत होत आहे. यावेळेस प्रथमच शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात गट एकमेकांविरोधात निवडणूक लढत असून शिवाजीराव पाटील गट शिक्षक संघासोबत मैदानात उतरला असून संभाजीराव थोरात गट शिक्षक समितीसोबत गेला आहे.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ३३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बॅंकेच्या इतिहासात प्रथमच तिसरे पॅनेल पडले आहे. शिक्षक संघ, शिक्षक समिती व स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलमध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी परिवर्तन आघाडीला केवळ १२ उमेदवार मिळाले आहेत.

शिक्षक संघाने शिवाजीराव पाटील यांचे विचार मानणाऱ्यांना एकत्र करुन सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखालील संघाचे पॅनेल उभे केले आहे. तर शिक्षक समितीच्या पॅनेलमध्ये राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समितीने १३ उमेदवार तर संभाजीराव थोरात गटाला सात जागा दिल्या असून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ दोंदे गटाला एक जागा दिली आहे.

Shikshak Bank Satara
शिक्षक अन् पदवीधरसाठी आघाडीचे जागावाटप ठरलं; अजितदादांची मोठी घोषणा

बँकेच्या इतिहासात प्रथमच तिसरे पॅनेल पडले आहे. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीने १२ जागांच्या माध्यमातून संघ, समितीपुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यांना नऊ ठिकाणी उमेदवार देता आले नाहीत. तर उमेदवारदरम्यान, जुनी पेन्शन हक्क संघटनेने निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसत आहे.

Shikshak Bank Satara
मोठी बातमी : बॅँक परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com