NCP : ‘राष्ट्रवादी’च्या नगर जिल्हा महिला अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपद निवडीच्या हालचाली सुरू आहेत.
NCP
NCP Sarkarnama
Published on
Updated on

अशोक निंबाळकर

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपद निवडीच्या हालचाली सुरू आहेत. दिवाळीपूर्वी ही नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी पक्षपातळीवर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या पदावर काम करण्यासाठी अनेक महिला कार्यकर्त्या इच्छुक आहेत. आगामी जिल्हा परिषदेसह इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. पक्षश्रेष्ठींकडून त्या दृष्टीने विचार केला जात आहे. अकोले येथील सुनीता भांगरे, पाथर्डी येथील प्रभावती ढाकणे व योगिता राजळे, संगमनेरच्या अमृता कोळपकर यांच्या नावांची चर्चा आहे.

जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकर जिल्हाध्यक्ष नियुक्ती करा, असा आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना दिला होता. त्यांनी दिलेली ३० सप्टेंबरची तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ही नियुक्ती केली जाण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी वर्तवली.

NCP
NCP : पवारांवर टीका करणाऱ्या सदावर्ते यांच्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भांगरे यांनी आजवर अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या त्या कार्यकारिणीवरही आहेत. ढाकणे या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. घरात राजकीय वारसा असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. योगिता राजळे या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊबाई आहेत. शाळेच्या माध्यमातून त्यांचे काम आहे. त्यामुळे व्यवस्थापनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

अमृता कोळपकर या वक्ता आहेत. युवतीचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. या नावांवरच श्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. किंवा ऐनवेळी दुसरेच नाव निश्चित होण्याची शक्यताही पक्ष वर्तुळात व्यक्त होत आहे.

NCP
NCP News: खडसे आणि भाजप यांच्यात समेट होणे अशक्यच!

संघटन वाढीचा विचार

राष्ट्रवादीत सध्या सदस्य नोंदणीची मोहीम सुरू आहे. त्यानंतर सर्व सेलची पुनर्रचना केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात मोठे संघटन आहे. मातब्बर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. हेच पक्षाचे शक्तिस्थान आहे. नियुक्तीवेळी संघटनावाढीच्या क्षमतेचा विचार केला जाणार आहे. सध्या भांगरे, ढाकणे, राजळे, कोळपकर यांची नावे आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com