मुक्ताईनगर : भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सातत्याने विविध नेत्यांबाबत ते भाजपत प्रवेश करणार असल्याच्या कोणताही आधार नसलेल्या बातम्या (Planted News) पेरण्याचे काम केले जाता. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत हाच प्रकार भाजपने केला. मात्र आता एकनाथ खडसे आणि भाजप पक्षात समेट होऊच शकत नाही. असे समेट कदापी होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांनी केला. (NCP clearify that BHP is spreading rumor about Eknath Khadse)
ते म्हणाले, एकनाथ खडसे यांना बदनाम करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे. त्याला योगय्वेळी चोख उत्तर दिले जाईल. कोणत्याही स्थितीत भाजपच्या अशा षडयंत्रांना यश येणार नाही.
श्री. पाटील न्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मला भूमिका मांडणे आवश्यक वाटते. या चर्चेचे खंडन मी करतो. काही दिवसांपासून खडसेंच्या बाबतीत नको त्या वावटळी उठवण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने होत आहे.
जळगाव जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दमदार कामगिरीला कुठे तरी लगाम लागेल व त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होईल यासाठी असा संभ्रम निर्माण केला जात आहे.
आगामी ल्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला पोषक वातावरण तयार होऊन त्याचा फायदा होईल, हा देखील भाजपचा त्यामागचा हेतू आहे. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी ज्या भाजपने नाथाभऊंची गेल्या चाळीस वर्षाची अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द कूटनीतीने संपवण्याचा घाट रचला होता, त्या भाजपसोबत नाथाभाऊंचा समेट यापुढे कधीही शक्य नाही.
आमदार खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खढसे यांनी ऐनवेळी भाजपचे तिकीट जाहीर करून त्यांचा पराभव कसा करता येईल, याची रणनीती आखली. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या खडसे यांच्या बाबतच्या चर्चा निरर्थक आहेत, असे श्री. पाटील म्हणाले.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.