Sangali News : घरात घुसून तरुणाचा कॉंग्रेस आमदाराच्या गाडीवर हल्ला; वाचा काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी प्रतिकचा मोबाईल हॅक करण्याच्या कारणावरुन दोघांसोबत वाद झाला होता.
A young man attacked the house of a Congress MLA Vikramsinh Sawant
A young man attacked the house of a Congress MLA Vikramsinh SawantSarkarnama
Published on
Updated on

Sangali News : सांगलीच्या जत येथील काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या घराच्या आवारात घुसुन एका तरुणाने त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (१० फेब्रुवारी) दुपारी ही घटना दुपारी घडली. या प्रकरणी प्रतीक देशमाने असे अचक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. पण आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मात्र त्या तरुणाला सोडून देण्यास सांगितले. (A young man attacked the house of a Congress MLA)

काही दिवसांपूर्वी प्रतिकचा मोबाईल हॅक करण्याच्या कारणावरुन दोघांसोबत वाद झाला होता. न दिवसांपूर्वी पुन्हा त्यांच्यासोबत प्रतिकचा वाद झाला. रागाच्या भरात प्रतिकने त्या दोघांना तुम्ही कुठे आहे, असे विचारल्यावर त्यांनी आपण आमदार साहेबांच्या घरासमोर असल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रतिकने वडिलांना बॅंकेत सोडले आणि थेट आमदार सावंत यांच्या घराकडे धावला.

A young man attacked the house of a Congress MLA Vikramsinh Sawant
Hindenburg-Adani Case: हिंडेनबर्ग -अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सेबी आणि अर्थमंत्रालयाला महत्त्वाचे आदेश

प्रतिक तिथे पोहलचा पण ते दोघे तिथे पोहचला, पण ते दोघे तिथे न दिसल्याने रागाच्या भरात त्याने आमदार सावंताच्या घराच्या आवारात घुसत त्यांच्या घरासमोरी कुंड्या घेऊन आदळाआपट केली, त्यांच्या गाडीचेही मोठे नुकसान केले. सुदैवाने एका विवाह समारंभाच्या निमित्ताने आमदार सावंत हे मतदारसंघात गेले होते.

सावंत यांच्या घरातील शिपाई आणि रखवालदारांनी प्रतिकला अडवण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिक नशेत असल्यामुळे कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर कार्यकर्त्यांनी त्याला शांत करत पोलिसांच्या ताब्यात दिले. पण सावंत यांना घडला प्रकार समजताच त्यांनी प्रतिकला सोडून देण्याची सूचना जत पोलिसांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com