Kolhapur Mahapalika News : कोल्हापूरला आयुक्त मिळावा म्हणून आम आदमी पक्षाचं अंबाबाईला साकडं

Kolhapur News : कांदबरी बलकवडे यांची बदली झाल्यापासून कोल्हापूरला आयुक्ताची नमणूकचं करण्यात आलेली नाही.
Kolhapur Mahapalika News :
Kolhapur Mahapalika News :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कांदबरी बलकवडे यांची पुण्यात बदली झाली, तेव्हापासून कोल्हापूरला आयुक्ताची नमणूकचं करण्यात आलेली नाही. यामुळे शहरातील अनेक महत्त्वाची विकासकामे ठप्प पडली आहे. कोल्हापूर महापालिकेला आयुक्त मिळावा यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने अंबाबाईल साकडं घालण्यात आलं. आप'चे प्रदेश सचिव संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त नसल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे कार्यभार आहे. तरीही अनेक कामे रखडली आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. प्रशासन प्रमुख नसल्याने सर्वकाही अस्ताव्यस्त झाले आहे. सत्ताधारी आपल्या मर्जीतला अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्यातील वादामुळे अधिकाऱ्याची नेमणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे तातडीने आधी आयुक्त नेमावे, अशी मागणी करत आप'च्या कार्यकर्त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीला साकडं घातलं.

Kolhapur Mahapalika News :
Ram Shinde Criticized Rohit Pawar : 'आजोबा चार वेळा मुख्यमंत्री, चुलते पाच वेळा उपमुख्यमंत्री, माझाही नातू... ; राम शिंदेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

दरम्यान, जून २०२३ मध्ये राज्यभरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून कोल्हापूर महापालिकेला आयुक्तच नाहीत.

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांतच महापालिका आयुक्तपदी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. याच काळात महापालिकेची मुदत संपल्याने कादंबरी यांच्याकडे महापालिकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी आली. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी प्रशासक म्हणून महापालिकेचे कामकाज पाहिले. पण जूनमध्ये त्यांची बदली झाल्यापासून कोल्हापूरला आयुक्ताची नेमणूक व्हावी, अशी मागणी आपकडून करण्यात आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com