Prashant Paricharak : अभिजीत पाटलांचं ठरलं; आता प्रतीक्षा प्रशांत परिचारकांच्या निर्णयाची!

Assembly Election 2024 : प्रशांत परिचारकांनी विधानसभा लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हे त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे, त्यामुळे पंढरपूरकरांना परिचारकांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
Prashant Paricharak
Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 August : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी अखेर माढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. माढ्यातून कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबतचे पत्ते पाटील यांनी अद्याप ओपन केलेले नाहीत.

अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघ निवडल्याने आता माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, परिचारकांनी विधानसभा लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हे त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे, त्यामुळे पंढरपूरकरांना परिचारकांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी (Pandharpur Assembly Constituency) आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak ), विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, विद्यमान अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिलीप धोत्रे यांच्या उमेदवारीची राज ठाकरेंनी घोषणा केली आहे, त्यामुळे पंढरपुरातील दोघांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी माढ्याचा पर्याय निवडल्याने पंढरपूरमधील (Pandharpur) एका स्पर्धकाची संख्या कमी झाली आहे. आता महायुतीकडून पंढरपुरात कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महायुतीच्या उमेदवारीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्याबरोबरच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचाही दावा असणार आहे. कारण, त्यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत माघार घेत समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे आत्ता आपल्याला उमेदवारी मिळावी, असा प्रशांत परिचारक गटाचा आग्रह आहे.

Prashant Paricharak
Dattatray Bharane : जनसन्मान यात्रेला येताना आपापल्या बायकांना आणा; आमदार भरणेंचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना सल्ला

प्रशांत परिचारक यांनीही विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत स्पष्टपणे दिले आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवणार, याबाबतचे कोणतेही भाष्य केलेले नाही, त्यामुळे समाधान आवताडे यांना पुन्हा भाजपची उमेदवारी मिळाली तर प्रशांत परिचारक यांची भूमिका काय असणार, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी ज्याप्रमाणे धाडस दाखवले तसा निर्णय प्रतीक्षा परिचारक घेणार का, हाही खरा प्रश्न आहे. भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर परिचारक यांची भूमिका काय असणार हेही महत्वाचे असणार आहे.

Prashant Paricharak
Badlapur School Case : बलात्काऱ्यांचे हारतुरे घालून स्वागत केलं, तर समाजात त्याचा काय परिणाम होणार?; प्रणिती शिंदेंनी साधला भाजपवर निशाणा

पंढरपूर मतदारसंघातून महाराष्ट्र निर्माण सेनेने दिलीप धोत्रे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. तसेच, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे भाजपने तिकिट न दिल्यास प्रशांत परिचारक निवडणूक लढवण्याची भूमिका घेणार का आणि घेतला तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com