Samadhan Avtade : पंढरपूर पोटनिवडणुकीत उमेदवारी निश्चित कशी झाली?; आवताडेंनी सांगितली फडणवीसांसोबतच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Pandharpur By Election : मी आमदार होण्यापूर्वी पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघात परिचारक आणि भालके गटात टोकाचा संघर्ष होता. या दोन्ही गटातील संघर्षामुळे विकास कामांमध्ये अडचणी येत होत्या. या अडचणीसंदर्भात एकलासपूर येथील दूध केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी माझी उमेश परिचारक यांच्यासोबत चर्चा झाली होती.
Devendra Fadnavis-Samadhan Autade-Prashant Paricharak
Devendra Fadnavis-Samadhan Autade-Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 18 August : पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून पंढरपूर मतदारसंघात सध्या आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परिचारक यांच्याकडून उमेदवारीसंदर्भात वारंवार भाष्य केले जात आहे.

त्यावरील मौन आता आमदार समाधान आवताडे यांनी सोडले असून उमेदवारीचा निर्णय घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांच्यातील बैठकीची इनसाईड स्टोरीच सांगून टाकली आहे.

आमदारकीच्या कार्यकाळात केलेली विकास कामे आणि आगामी विधानसभा निवडणुकीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषेदत समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी पोटनिवडणुकीत आपली उमेदवारी कशी निश्चित झाली, याबाबतची माहिती दिली आहे. त्यावर आता परिचारक गटाची काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.

मी आमदार होण्यापूर्वी पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघात (Pandharpur-Mangalvedha) परिचारक आणि भालके गटात टोकाचा संघर्ष होता. या दोन्ही गटातील संघर्षामुळे विकास कामांमध्ये अडचणी येत होत्या. या अडचणीसंदर्भात एकलासपूर येथील दूध केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी माझी उमेश परिचारक (Umesh Paricahrak) यांच्यासोबत चर्चा झाली होती.

त्या चर्चेत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात नेतृत्वासाठी मी तुम्हाला समर्थन करतो, नाहीतर मी नेतृत्व करतो, तुम्ही समर्थन करा, ही भूमिका मांडली होती, असे आवताडे यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis-Samadhan Autade-Prashant Paricharak
Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी दीपक साळुंखेंना डिवचले; ‘मला मैदान सोडायची सवय नाही, निवडणूक ताकदीने लढणार’

आवताडे म्हणाले, मी मांडलेली भूमिका त्यावेळी उमेश परिचारकांना रास्त वाटली. त्यानंतर लागलेली पोटनिवडणूक लढवण्याबाबत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक एकत्र बसलो होतो. त्या बैठकीत मी निवडणूक लढविण्याबाबत एकमत झाले आणि पोटनिवडणुकीचा उमेदवार म्हणून माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत आमदार प्रशांत परिचारक यांनी ‘सुमारे 80 हजार मते घेणाऱ्याला थांबावे लागले आणि चाळीस हजार मते घेणाऱ्याला पोटनिवडणुकीत आमदार केले, असे बोलताना सांगितले होते.

Devendra Fadnavis-Samadhan Autade-Prashant Paricharak
Hussain Dalwai : मुख्यमंत्र्यांनी डोकं चालवून काम करावं, असला मुख्यमंत्री चालणार नाही; हुसेन दलवाईंचा हल्लाबोल

त्यावर आमदार आवताडे म्हणाले, पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून आम्हा दोघांपैकी कुणाला संधी द्यायची, या विषयावर जी चर्चा झाली. त्या चर्चेत जे साक्षीदार आहेत, त्यावर योग्य वेळ आल्यावर त्या चर्चेचा तपशील जाहीर करू आणि त्याबाबत एकदाचा सोक्षमोक्ष लावू, असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com