

Pandharpur, 15 February : राजकीय स्वार्थासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांसह चळवळीतील कार्यकर्त्याचा राजकीय बळ दिला आहे. रातोरात निरोप दिले गेले आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला, असा गंभीर आरोप रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी केला आहे. भोसले यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंढरपूर पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातूनच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्यावर निशाणा साधल्याने पंढरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भोसले म्हणाले, आमदार अभिजीत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून सरकोली गणातून माझी पत्नी वर्षा भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मतदानाच्या एक दिवस आगोदर कासेगाव गटात व सरकोली गणात राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) व शरद पवार गटाच्या उमेदवारांना चांगले वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख आणि मी स्वतः सर्व गावांत जाऊन प्रचार केला होता. लोकांनी शब्दही दिला होता. परंतु भालके आणि आमदार अभिजीत पाटील यांची रात्रीतून मिलीभगत झाली.
आमदार पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या मार्फत रात्रीतून कासेगाव गटातील व सरकोली गणातील मतदारांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला, असा आरोप भोसले यांनी केला आहे.
केवळ राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या आमदार पाटील यांनी आमच्यासारख्या चळवळीतून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांचा बळी घेतला आहे. यापुढच्या काळात आमदार पाटील -भालके यांच्या आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनाही भालके-आमदार पाटील यांनी विश्वासघाताचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. भोसले-देशमुख यांच्या आरोपाला आमदार अभिजीत पाटील काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहेे.
साखर कारखानदारांनी गेम केला...
ऊसदर आंदोलनाची चळवळ उभी करण्यामध्ये दीपक भोसले, समाधान फाटे, संग्राम गायकवाड, नवनाथ माने यांच्यासह अनेक छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. ऊसदर आंदोलन चळवळीतून पुढे आलेल्या या कार्यकर्त्यांनी यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.
शेतकरी नेते दीपक भोसले यांच्या पत्नी वर्षा भोसले, समाधान फाटे यांच्या मातोश्री मालन फाटे, नवनाथ माने यांचा दारूण पराभव झाला तर संग्राम गायकवाड यांना ऐनवेळी माघार घेण्यास भाग पाडले. या निवडणुकीमध्ये साखर कारखानदारांनीच चळवळीतील नेत्यांचा पराभव केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.