पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे ते २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती. (Abhijeet Patil, President of Vitthal Factory, joined NCP in the presence of Sharad Pawar)
विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, बबनराव शिंदे, संदीप क्षीरसागर, संजय पाटील, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे यांच्यासह पक्षाचे मान्यवर उपस्थित हेाते. अभिजित पाटील यांच्या प्रवेशामुळे पंढरपुरात राष्ट्रवादी आणखी बळकट झाली आहे. त्यामुळे पंढरपुरात भाजप विरोधात राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील असा सामना पहायला मिळू शकतो.
गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना मात अभिजित पाटील हे प्रकाशझोतात आले होते. साखर कारखाना क्षेत्रातील अभिजित पाटील हे आज मोठे नाव आहे. राज्यातील तब्बल पाच साखर कारखाने चालवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबरोबरच त्यांचा भाजपशीही दोस्ताना होता, त्यामुळे अभिजित पाटील नेमके कुणाचे, असा प्रश्न विचारला जात होता, त्याला आज उत्तर मिळाले आहे.
अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यामधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. पवार यांच्याशी त्यांचे असलेले संबंध यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी पक्की करुन घेण्याच्या दृष्टीनेही पाटील गटाने आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.