Abhijit Bichukale: "महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री!"; बिचुकले पत्नीला असं का म्हणाले?

Abhijit Bichukale: ''सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही..''
Abhijit Bichukale latest news
Abhijit Bichukale latest news Sarkarnama

Abhijit Bichukale News : बिगबॉस फेम अभिजित बिचुकले हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांच्याकडून अनेक खळबळजनक दावे देखील केले जातात. आता अभिजित बिचुकले यांनी आपल्या पत्नीला राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विडा उचलला आहे.

अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला पत्र लिहून मनातल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. बिचुकले नेहमीच धक्कादायक विधाने करून राजकीय पटलावर चर्चेत राहतात. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री पासून ते थेट राष्ट्रपती होण्याची स्वप्नं देखील पाहिली आहे. आता असंच एक मोठं स्वप्नं पाहून बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त त्यांनी आपल्या अर्धांगिनी अलंकृता बिचुकले यांना जाहीर पत्र लिहून आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यांच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून त्यांनी उचललेला महिला सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Abhijit Bichukale latest news
Sanjay Raut : राहुल गांधींना विचारलेला प्रश्न शेतकऱ्यांना का विचारत नाही ; राऊतांचा सवाल

स्वतःच्या सौभाग्यवतीलाच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विडा उचलला आहे. एकीकडे सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे बिचुकले याने महिला मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उचलून धरला आहे.

"महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री...

"महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री... हे मी पहिल्यांदाच बोललेलो नाही. माझ्या अर्धांगिनी यांनी 2009 साली उदयनराजे यांच्याविरोधात पहिली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हादेखील एका पत्रकार परिषदेत मी असं म्हणालो आहे."

बिचुकले म्हणाले,"मुख्यमंत्री होणाऱ्या महिलेला भारतीय संस्कृतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ती माझ्या पत्नीप्रमाणे संस्कृती जपणारी हवी. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मी मांडणार आहे. सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही असेही बिचुकले यांनी यावेळी सांगितले.

Abhijit Bichukale latest news
Abdul Sattar: सत्तारांच्या अडचणीत वाढ; गायरान जमीन प्रकरण, कृषिमहोत्सवानंतर 'हे' नवीन संकट उभं!

शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटातील लूकबाबतही मोठं वक्तव्य..

अभिजीत बिचुकलेनं शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील लूकबाबत वक्तव्य केलं होतं.'शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. बिग बॉसमध्ये माझी अशीच हेअरस्टाईल होती. 1991 मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबाचे लांब केस होते. मात्र, आता 2022 वर्षा जी स्टाईल आणली गेली ती माझी आहे असं मला वाटतं. शाहरुख खानने माझ्यावेळीचे बिग बॉस पाहिलं असावं. सीझन 15 मध्ये काय दिवे लावले काय केलं हे शाहरुखने पाहिलं असावं. त्यामुळे शाहरुखने केलेली ही स्टाईल माझीच आहे असा दावाही बिचुकलेनं केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com