Nagar News : लाचखोर महिला सरपंच पतीसह अटकेत; दहा टक्के कमिशन घेताना ACB ने पकडलं!

ACB Nagar Trap: मुदतीत सर्व काम पूर्ण केली होती. मात्र तरीही केलेल्या कामाचे बिल निघण्यास अडचणी येत होत्या.
ACB trap
ACB trapSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : महिला सरपंचाला ४० हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलं. श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगावात ही कारवाई करण्यात आली. सरपंच उज्वला सतीश रजपूत आणि पती सतीश बबन रजपूत या दोघांना अटक करण्यात आली आहे.

४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांच्या खर्चातून करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामात दहा टक्के ४६ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारताना कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा टेंडर घेतले होते. या कामाचा एकूण खर्च 4 लाख 61 हजार 568 रुपये इतका होता. ठरलेल्या मुदतीत ठेकेदाराने मुदतीत सर्व काम पूर्ण केली होती. मात्र तरीही केलेल्या कामाचे बिल निघण्यास अडचणी येत होत्या.

ACB trap
Rohit Pawar : रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन् मराठा तरुण भिडले! दोघांना मारहाण...

तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच व त्यांचे पती यांना विनंती केल्यावर त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाकडे 10 जुलैला केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 10 जुलै रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांच्याकडे 46 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.

बिल जमा झाल्यानंतर काल (गुरुवारी) आरोपी महिला सरपंच उज्वला रजपूत यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेऊन बोलविले असता कोकणगाव ग्रामपंचायत येथे आज (शुक्रवारी) रोजी सापळा लावण्यात आला.

श्रीगोंदा पोलिसांना उज्वला सतिष रजपूत (वय 32 वर्ष) आणि सतिष बबन रजपूत (वय 42) यांना अटक केली आहे. शरद गोर्डे, रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, संध्या म्हस्के, राधा खेमनर दशरथ लाड यांच्या पथकानं ही कारवाई केली.

(Edited By: Mangesh Mahale)

ACB trap
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी शेतीही विकली; ना आरोग्य ना कुटुंबाची चिंता, फक्त आरक्षण अन् आरक्षणच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com