Rohit Pawar : रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन् मराठा तरुण भिडले! दोघांना मारहाण...

Maratha Reservation : पोलिसांनी मध्यस्थी करीत तरुणांना संवाद यात्रेतून बाहेर काढलं.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल (गुरुवार) युवा संघर्ष यात्रा ही घनसावंगी मार्गे परतूर तालुक्यातील दैठणा गावात दाखल झाल्यानंतर रात्री रोहित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या वेळी गावातील दोन तरुणांनी पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री राजेश टोपे यांना मराठा आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना मारहाण केल्याचे समजते.

"मराठा आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना तुम्ही भेटला नाहीत," असे सांगत तरुणांनी विरोध केला. "तुम्ही ओबीसी आंदोलनाला भेट देतात, मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत? गावागावांत सभा नेत्यांना बंदी असताना तुम्ही सभा कशी घेता? असा जाब त्यांनी विचारला. त्यानंतर वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करीत तरुणांना संवाद यात्रेतून बाहेर काढलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दरम्यान सभा घेऊ नका म्हणून सांगायला गेलो असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. मारहाण झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि मराठा तरुण भिडल्याची माहिती समोर आली आहे.

Maratha Reservation
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणून आषाढीला महापूजा कधी करणार? फडणवीस म्हणाले,...

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाज मात्र जोरदार विरोध करताना दिसत आहे. अशातच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात खडाजंगी सुरू आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या," जरांगे पाटील हे सुरुवातीला आरक्षणासाठी लढत असल्याचं निश्चित वाटत होतं, पण अलीकडे त्यांची भूमिका पाहून आरक्षणावरील लक्ष्य विचलित झाल्याचं वाटत आहे. त्यांनी व्यक्तिगत टीकाटिप्पणी करणं शोभत नाही."

Maratha Reservation
Manoj Jarange Patil : जरांगेंच्या रात्रीच्या जेवणाला उजाडते पहाट; उपोषणानंतर अंगात त्राण नाही म्हणून लढ्याला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com