Police Run Away : काय सांगता ! चक्क पोलिसावरच आली पळून जाण्याची वेळ, रात्र काढली उसात; काय आहे कारण ?

ACB Trap And Police Run : अहमदनगरच्या बेलवंडी पोलीस ठाण्यातील प्रकाराने चर्चांना उधाण
ACB
ACBSarkarnama

Belwandi Police And ACB Trap : घेतलेली लाच कपाटात ठेव, असे आदेश पोलिसाने फिर्यादीला दिले. त्यानुसार फिर्यादी रक्कम कपाटात ठेवत होता. तितक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तेथे पोहचले. पोलिसाला संशय आला आणि त्याने चक्क शेजारील उसाच्या शेतातच धूम ठोकली. त्याचा अद्यापही काही थांगपत्ता लागला नसल्याची माहिती आहे. ही घटना बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथील पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. २१) सांयकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुरुवारी (ता. २१) पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल झाला. (Latest Marathi News)

ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्याच्याविरुधात आलेल्या तक्रारीनुसार नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्यात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे रक्कम घेवून फिर्यादी ठाण्यात गेला होता. तेथे 'साहेबां'चे ऑडिट सुरु असल्याने सदर पोलिसाने फिर्यादीस 'कपाटात ठेव' असा संदेश दिला. त्याचवेळी एसबीचे पथक ठाण्यात पोहचले. पथकातील कर्मचारी फिर्यादीसोबत कपाटाकडे गेले. त्याचवेळी संशय आल्याने कुठलाही विचार न करता पोलीस पठारे याने ठाण्यातूनच धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत उसाच्या शेतात शोध सुरु होता, मात्र पोलिस काही सापडला नाही.

ACB
Ahmednagar Politics : वाळू डेपोबाबत अधिकाऱ्यांना विखे पाटलांची तंबी; म्हणाले, 'कुणी कितीही अडथळे..'

अधिक माहितीनुसार, फिर्यादी व त्याच्या पत्नीविरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यातील जामीन प्रक्रियेत मदत करतो म्हणून चार हजाराची मागणी आरोपी पठारे याने केली होती. बेलवंडी पोलीस ठाण्यात 'साहेबां'च्या जवळ असणाऱ्या पठारे या हवालादाराने लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे दाखल झाली. लाच देण्याचे बुधवारी ठरले होते. त्यानुसार एसीबीचे पथक बेलंवडीत होते. एसीबी पथकाच्या इशाऱ्यावर फिर्यादी बेलंवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. चार हजार रुपये आणल्याचे फिर्यादीने पठारे यांच्या जवळ जात सांगितले. त्यावेळी बेलवंडी पोलीस ठाण्यात ऑडिट नगरचे पथक करीत होते. त्यामुळे पठारे याने फिर्यादीला मागच्या खोलीतील कपाटात ठेव असे सांगितले.

फिर्यादी रक्कम कपाटात ठेवण्यासाठी गेले त्यांच्यासोबत पथकातील कर्मचारीही गेले. हे सगळे सुरु असतानाच पठारे याला संशय आला. आपण सापडलो हे लक्षात येताच पठारे याने पथकाच्या समोरूनच धूम ठोकली. एरव्ही एखादा आरोपी ठाण्यातून पळून गेल्याचे ऐकले असेल, या घटनेत मात्र पोलिसच पळाला. तो पळून जाईल याची पथकाला संशय नव्हता. त्यामुळे पथकातील अधिकारी गाफील होते. त्याचाच फायदा घेवून आरोपी ठरणारा पोलीस पळून गेला.

ACB
Ajit Pawar News : निलेश लंके तर 'लंका'च पेटवत चाललाय ! अजितदादांकडून कामाचे कौतुक अन् विरोधकांना चिमटा

ठाण्यापासून जवळ असणाऱ्या उसाच्या शेतात आरोपी पोलीस पठारे गेला. त्याच्या तपासासाठी नगरचे ऑडिट करण्यासाठी आलेले पथक, बेलवंडी पोलीस व एसीबीची टीम सगळेच शोध घेत होते. मात्र रात्रभर शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे शेवटी उशिरा गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. या ट्रॅपदरम्यान सिनेमाला लाजविणारी घटना बेलवंडी पोलीस ठाण्यात घडली. या घटनेची आता जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com