Ajit Pawar News : निलेश लंके तर 'लंका'च पेटवत चाललाय ! अजितदादांकडून कामाचे कौतुक अन् विरोधकांना चिमटा

Ajit Pawar Praised Nilesh Lanke: लोकसभेत दक्षिण अहमदनगरमधून लंके यांना उमेदवारीची चर्चा
Ajit Pawar, Nilesh Lanke
Ajit Pawar, Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Rashtrawadi Vardhapan Din Speech: राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन 10 जून होता. दरम्यान, 25 व्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदार्पण करताना पक्षाचा मेळाव्याचे आयोजन अहमदनगर येथे नियोजित करण्यात आलं होते. मात्र हवामान खात्याने 9 जून च्या दरम्यान बिपरजॉय वादळाचा इशारा दिला. त्यामुळे अहमदनगर येथे होणारा पक्षाचा भव्य दिव्य मेळावा ऐनवेळी रद्द केला. त्यानंतर हाच मेळावा बुधवारी (21 जून) रोजी मुंबई येथे पार पडला. (Latest Marathi News)

या मेळाव्यानिमित्त पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतचा एकूणच आढावा घेतला. हा आढावा घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे 'फायर ब्रँड' राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विविध मुद्दे आपल्या भाषणात मांडले. यातच त्यांनी एक मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण नवीन तरुण कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संधी देणं असं असल्याचं सांगितलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

Ajit Pawar, Nilesh Lanke
File Missing From Ministry : अबब! मंत्रालयातून झाली चक्कं फाईल गायब; कुणी केली फाईल नष्ट?

याचा संदर्भ देत असताना 2019 ला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नियोजनबद्ध किंवा ऐनवेळी संधी दिली. या उमेदवारांनीही पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आपापल्या निवडणुका जिंकल्या. यात अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव विशेष करून घेतले. 'लंके ती आता लंकाच पेटवत निघाले आहेत' असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले.

आमदार निलेश लंके सतत विविध कारणांनी चर्चेत असतात. कधी कोरोना काळात आरोग्य मंदिर उभे करतात. कधी मुलींना हजारोच्या संख्येने सायकली वाटतात. रोजगार मेळावे भरून शेकडो युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोरोना काळातच घरी परतणाऱ्या कामगारांना त्यांनी रस्त्यावर उभे राहून मोठी मदत केली. त्यांच्या एकूणच या सर्व कामाची दखल मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आणि त्यांना प्रसिद्धीही मिळाली.

Ajit Pawar, Nilesh Lanke
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ आक्रमक; केंद्रासह राज्य सरकारच्या दडपशाहीचा हिशेबच केला, म्हणाले...

एकूणच निलेश लंके यांचा उल्लेख केल्यानंतर नंतर अजित पवार यांनी निलेश लंके हे तर आता लंकाच पेटवत निघालेले आहेत, असं सांगत अहमदनगर जिल्ह्यात सध्या आमदार लंके विरुद्ध विखे पिता-पुत्र यांच्यात एकमेकांविरोधात सुरू असलेल्या वाकयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सूचक अशी टिप्पणी केली. आमदार निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर दक्षिणेतून उमेदवारी देण्याची चर्चा आहे.

या संदर्भात त्यांना पक्षाने यापूर्वीच संकेत दिले असून निलेश लंके यांनीही दक्षिण मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघात पूर्ण लक्ष केंद्रीत करून काम सुरू केलेले आहे. या पार्श्वभूमीवर निलेश लंकेंचा अजित पवार यांनी विशेष उल्लेख करत नगर जिल्ह्यात लंके हे पक्षाचे फायर ब्रँड नेते असल्याचे स्पष्ट केले.

Ajit Pawar, Nilesh Lanke
Anil Ramod Suspended : लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड अखेर निलंबित !

जिल्ह्यातीलच अकोले मतदारसंघात डॉ. किरण लहामटे यांनाही पक्षाने 2019 ला उमेदवारी दिली. याबाबत बोलताना अजित पवारांनी त्यावेळी वैभव पिचड यांना उमेदवारी करण्याचा मोठा आग्रह केल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेलाच असल्याने डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनीही मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली आणि वैभव पिचड अकोल्यातून पराभूत झाल्याचे सांगितले.

अजित पवारांनी 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन उमेदवारांना कशा पद्धतीने कोणाला उमेदवारी दिली. या सर्वांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत निवडणूक जिंकली, याचा विशेष उल्लेख केला. यात संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे, चंद्रकांत नवघरे, अण्णासाहेब बनसोडे, दौलत दरोडा, सुनील शेळके, स्वर्गीय भारत भालके, डॉ. किरण लहामटे, संजय बनसोडे, अपक्ष संजयमामा शिंदे, अपक्ष देवेंद्र भुयार यांची नावे घेतली. अजित पवार यांनी या माध्यमातून पक्षांमध्ये युवक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचे धोरण पक्षाचे असल्याचे व अनेक ठिकाणी भाकरी फिरवली जाणार असल्याचे स्पष्ट केलंय.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com