Solapur News : मोहिते-पाटील बँकेवर RBI चे निर्बंध; खातेदारांना पाच हजारापर्यंत रक्कम काढता येणार

या बॅंकेवर २४ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असणार आहेत.
Shankarao Mohite-Patil Bank
Shankarao Mohite-Patil BankSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : बँकांची आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे पाहून आरबीआयने (RBI) देशातील देशातील पाच बँकांवर कारवाई केली आहे. या पाच बँकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील (Mohite-Patil) सहकारी बँकेचा (Bank) समावेश आहे. या बँकेतील खातेदारांना आता पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. (Account holders can withdraw up to five thousand from Shankarao Mohite-Patil Bank)

दरम्यान, या बॅंकेवर २४ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असणार आहेत. या संदर्भातील आदेश आरबीआयचे चीफ जनरल मॅनेजर योगेश दयाल यांनी काढले आहेत. आरबीआयने या बँकेच्या खर्चावरही नियंत्रण आणण्याच्या सूचना केल्या आहेत. बँकेचे पात्र ठेवीदार हे विमा आणि क्रेडिट हमी नियमाप्रमाणे पाच लाख रुपयांपर्यंतची जमा विमा दावा रक्कम मिळविण्यास पात्र असणार आहेत.

Shankarao Mohite-Patil Bank
Mangaldas Bandal : कुणी कितीही अडविले तर लोकसभेची निवडणूक लढवणारच : मंगलदास बांदलांची घोषणा

येत्या ४५ दिवसांमध्ये बँकेला डीआयसीजीसीकडे (डिपॉझिट इन्शुरन्स ॲण्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन) ठेवीदारांची यादी सादर करावी लागणार आहे. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेच्या एकूण ९ शाखा व १ मुख्यालय अशी कार्यालये आहेत. ६ हजार ४८० एवढे बँकेचे सभासद आहेत. बँकेकडे ६९ कोटी रुपयांच्या ठेवी असून बँकेने ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

Shankarao Mohite-Patil Bank
Budget Session : शिंदे-फडणवीस सरकारपुढे मोठा पेच : राज्यमंत्री नसल्याने विधान परिषदेत अर्थसंकल्प कोण सादर करणार?

यासंदर्भात सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड म्हणाले की, बँकेच्या ठेवीदारांनी व खातेदारांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आरबीआयने दिलेल्या सूचनांनुसार या बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी सहकार विभागाच्या वतीने प्रयत्न केले जातील. आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. माळशिरस येथील सहायक निबंधकांनी आज शनिवारी ता. २५ रोजी सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com