सरकार बदलूनही बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा वनवास संपेना!

आमदार बच्चू कडू यांच्या विधानसभेतील तडाखेबद भाषणाने मात्र मंगळवेढा व सांगोल्यातील जनतेला (स्व) गणपतराव देशमुख व (स्व) भारत भालके यांच्या भाषणाची आठवण झाली.
Activists of Bacchu Kadu
Activists of Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : भूसंपादनाच्या मोबदल्यावरुन प्रहार शेतकरी संघटनेचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरुच आहे. सांगोला (Sangola) तालुक्यातील जुनोनी येथील जीवंत शेतकऱ्याला मयत दाखवण्याचा प्रताप येथील प्रांत कार्यालयाने केल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. दरम्यान, सत्ताबदलापूर्वी व सत्ता बदलानंतरही सत्तेत सहभागी असलेल्या आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या संघटनेच्या मागचे आंदोलनाचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. (Activists of Bacchu Kadu protest for compensation of land in Mangalvedha)

मंगळवेढा तालुक्यात रत्नागिरी व नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले असून त्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या मोबादल्याबाबत शेतकऱ्यांना वारंवार संघर्ष करावा लागला आहे. त्यासाठी प्रहार संघटनेने महाविकास आघाडीचे सरकार असतानाही आंदोलन केले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आमदार बच्चू कडू यांच्या संघटनेला संंघर्ष करावा लागला होता. किंबहुना त्यांची कामे होत नसल्याच्या कारणावरुन राज्यात सत्ताबदल करण्यासाठी आमदार कडूदेखील अग्रभागी होती . राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्याच प्रश्‍नासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार नाही, अशी खात्री या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, ती अपेक्षा फोल ठरल्याने सत्ताबदलानंतरही पुन्हा प्रहार संघटनेच्या वतीने याच प्रश्‍नावर उपोषण करण्यात येत आहे.

Activists of Bacchu Kadu
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध

गेली सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाहीत. त्यामुळे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावरचा रोष वाढत आहे. अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. सत्ताबदलानंतरही राज्यातील जनतेला त्यांच्या प्रश्‍नासाठी करावा लागणारा संघर्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची मनमानी यावर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी जोरदार आसूड ओढले होते.

Activists of Bacchu Kadu
शिंदे गटात जाणार...? राजन साळवी म्हणाले, ‘मला खोक्याची गरज...’

मी कोणत्या पक्षाचा आहे, हे महत्वाचे नाही. कुठे बसलोय, हेही महत्वाचे नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जोरदार प्रहार करताना त्यांच्याच संघटनेच्या मंगळवेढ्यातील पदाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सहा दिवसांपासून मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. त्यावर महसूलमंत्र्यांना जाब विचारणेही अपेक्षित होते. पण, आमदार बच्चू कडू यांच्या विधानसभेतील तडाखेबद भाषणाने मात्र मंगळवेढा व सांगोल्यातील जनतेला (स्व) गणपतराव देशमुख व (स्व) भारत भालके यांच्या भाषणाची आठवण झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com