मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध

ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने मागे घ्यावा : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांची मागणी
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या दहिहंडी (dahi handi) प्रो-गोविंदा स्पर्धेच्या मान्यतेला सर्वच स्तरातून आता विरोध वाढू लागला आहे. यातच आता राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे (NCP) प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीही सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. कष्ट करुन अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून तो तातडीने मागे घ्यावा; अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (NCP's Shrikant Shinde opposes the decision to give job reservation to dahi handi players)

राज्यात दहिहंडी, गणेश उत्सव, नवरात्र या सारखे अनेक उत्सव आणि सण साजरे केले जातात. असे उत्सव डोळ्यासमोर ठेवून सरकार तरुणांना नोकरी देणार असेल तर १२-१२ तास अभ्यास करुन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही अनेक तरुणांना नोकरी नाहीत. त्यात आता दहीहंडी फोडणाऱ्या तरुणांना नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शिवाय ग्रामीण खेळांडूमध्ये नकारात्मकतेची भावना निर्माण होण्याची भीती आहे.

Shrikant Shinde
शिंदे गटात जाणार...? राजन साळवी म्हणाले, ‘मला खोक्याची गरज...’

ग्रामीण भागात कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या या सारखे अनेक खेळ जिवंत आहेत. या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या तरुणांना नोकरीत आरक्षण देण्याची खरी गरज असताना, केवळ शहरी भागा पुरता मर्यादीत असणाऱ्या दहिहंडीला मात्र शिंदे सरकारने खेळाचा दर्जा दिला आहे. या निर्णयाचा शिंदे सरकारने गांभीर्याने फेरविचार करण्याची गरज आहे.

Shrikant Shinde
इकडं ईडी, इन्कम टॅक्स आहे...त्यांचेच काही दोस्त जेलमध्ये जाऊन बसले आहेत’

अभ्यास करुन यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा अगोदर विचार करावा. ग्रामीण भागातील खेळांवर अन्याय करणारा हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा; अन्यथा या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com