Satara : अदानी प्रकरणाची आरबीआय, सेबीमार्फत चौकशी करावी : पृथ्वीराज चव्हाण

Congress 'हात से हात जोडो अभियान'चा प्रारंभ आज (शनिवार) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील काँग्रेस भवनात झाला.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

Congress News : अदानी Adani उद्योग समूहाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणाची आरबीआय, सेबीने चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारने Central Government अदानी एके अदानी हा अजेंडा थांबवून सर्वसामान्यांसाठी योजना राबवून उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारत जोडो यात्रा राज्यात यशस्वी झाल्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने 'हात से हात जोडो अभियान' चा विस्तारित कार्यक्रम दिला आहे. या अभियानाचा प्रारंभ आज (शनिवार) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवनात झाला. या कार्यक्रमानंतर श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. चव्हाण म्हणाले, स्टेट बँक ऑफ इंडिया व भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) मार्फत अदानींना मोठ्या प्रमाणात विनातारण कर्ज देण्यात आलेली आहे. सध्या परिस्थितीत अदानी समूहाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असल्याने स्टेट बँक व एलआयसीमधील सर्वसामान्यांचा पैसा असुरक्षित झाला आहे. अशी भयानक परिस्थिती असतानाही विविध मार्गाने अदानीला मदत करण्याचा खटाटोप केंद्राकडून सुरु आहे.

Prithviraj Chavan
Satara : बाळासाहेबांची शिवसेना, भाजप एकत्र बसून पराभवाची कारणे शोधणार : शंभूराज देसाई

जगातील सर्वात मोठा घोटाळा होवूनही अदानी बचाव करताना दिसत नाहीत. मात्र, दुसरीकडे केंद्रातील मंत्री अदानींच्या बचावासाठी सरसावले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला असून हा अर्थसंकल्प फसवा आणि भ्रमनिराश करणारा आहे.

Prithviraj Chavan
Priyanka Gandhi : ''अदानी,अंबानींनी सर्वांना विकत घेतलं, पण राहुल गांधींना ते विकत घेऊ शकले नाही;कारण..!''

श्री. चव्हाण म्हणाले. राज्यातील सरकार हे घटनाबाह्य असून न्यायालयीन लढ्यात हे सरकार कोसळणार आहे. सरकार टिकेल अशी शाश्वती नसल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. मंत्रीमंडळ विस्ताराच्या वावड्या उठल्या आहेत. तरीही अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Prithviraj Chavan
Narendra Modi News : पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पाबद्दल निर्मला सीतारामन यांचे केले कौतुक; म्हणाले...

काँग्रेसचे सोमवारी आंदोलन....

अदानी उद्योग समुहास स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्यावतीने (एलआयसी) विनातारण कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. हे कर्ज केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन दिले आहे. सध्या अदानींचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता धूसर आहे. वास्तविक या दोन्ही वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य माणूस गुंतवणूक करत असतो. हा सर्वसामान्यांचा पैसा परत मिळावा यासाठी काँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.6) दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Prithviraj Chavan
Congress News : काँग्रेसचा एक उमेदवार गेला; पण दोन मतदार संघ आणले खेचून : भाजपचे चाणक्य फेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com