सावंतांच्या प्रयत्नातून तीन वर्षानंतर सुरु झालेल्या 'आदिनाथ'ची मोळी टाकायला मुख्यमंत्री शिंदे येणार

Eknath Shinde News : आदिनाथचा गळीत हंगाम मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सुरू होणार
Adinath pvt Lt and shinde
Adinath pvt Lt and shinde Sarkarnama

करमाळा : तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेण्यात आला होता. माञ सरकार बदलताच बारामती अॅग्रोला आदिनाथ कारखाना देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. जो कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचा निर्णय झाला होता. त्याच आदिनाथ सह.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (ता.25) करण्यात येणार आहे.

करमाळा (Karmala) तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या आदिनाथ सह.साखर कारखान्यावर माजी आमदार शामलताई बागल गटाची सत्ता आहे. मात्र आदिनाथ समोरील अडचणी लक्षात घेऊन बागल गटाने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र बारामती (Baramati) ॲग्रोकडून तांत्रिक बाबी पुर्ण करण्यास उशीर होत गेला.

दरम्यान, ज्या बागल गटांनी बारामती ॲग्रोला आदिनाथ भाडे तत्वावर देण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच बागल गटाने दिड वर्षानंतर भाडेतत्त्वावर कारखाना देण्याच्या निर्णया विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मात्र बारामती ॲग्रोने कारखाना ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले.

Adinath pvt Lt and shinde
Pimpri Chinchwad : 'मुख्यमंत्र्यांचे भूखंडाचे श्रीखंड बाहेर काढल्याने जयंत पाटलांवर कारवाई!'

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले आणि माजी आमदार नारायण पाटील यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये थेट सहभाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विनंती करून माजी आमदार नारायण पाटील यांनी बारामती ॲग्रोला देण्याची प्रक्रिया थांबवली.

सध्या आदिनाथवर बागल गटाची सत्ता आहे. भाडेतत्त्वावर कारखाना देण्याची प्रक्रिया थांबवल्यापासून हा कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील संचालिका रश्मी बागल यांनी प्रयत्न केले. कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न करत असतानाच विरोधकांनी हा कारखाना सुरू कसा होणार नाही यासाठी प्रचंड ताकद लावली.

Adinath pvt Lt and shinde
Arvind Kejriwal : 'आप' राष्ट्रीय राजकारणात? स्थापनेपासून डोळे दिपवणारी घौडदौड

अनेक अडचणी आणल्या. अजूनही विरोधक कारखाना सुरू होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तरी देखील या सर्व अडचणीवर मात करून आदिनाथ कारखान्याचा 27 वा गळीत हंगाम शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू होत आहे.

गेली तीन वर्षे बंद असलेल्या आदिनाथचा गळीत हंगाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करून आदिनाथ चालू शकणार नाही असे म्हणणाऱ्या विरोधकांसाठी एक वेगळा संदेश या माध्यमातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com