Arvind Kejriwal : 'आप' राष्ट्रीय राजकारणात? स्थापनेपासून डोळे दिपवणारी घौडदौड

Aam Aadmi Party News : पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंतची 'आप' घौडदौड पाहता येणाऱ्या काळात...
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Aam Aadmi Party News : देशात सध्या आम आदमी पक्षाने चांगली घौडदौड सुरू केली आहे. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आता देशभरात आम आदमी पक्ष हळूहळू वाढताना दिसत आहे. गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील'आप'ने नशीब आजमावलं. त्यामुळे आता 'आप'राष्ट्रीय राजकारणात उतरताना दिसत आहे.

अरविंद केजरीवाल हे आपल्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस (Congress) आणि भाजपला (BJP) पर्याय बनू पाहत असल्याचं देखील तज्ञ सांगतात. 'आप'ने दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन केली. त्यानंतर पंजाबमध्ये देखील सरकार स्थापन केले. त्यानंतर गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाच आमदार निवडून आणले. तर गोव्यात आपला दोन आमदार निवडून आणण्यात यश आलं.

त्यामुळे आता ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच आपच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतची आपची घौडदौड थोडक्यात पाहूयात.

Arvind Kejriwal
Shambhuraj Desai : आम्ही गेलो होतो, पण कर्नाटक सरकारने त्याला वेगळे वळण दिले...

अशी आहे 'आप'ची घौडदौड?

2013 ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला 70 पैकी 28 जागा निवडून आणण्यात यश आले होते. त्यानंतर आपने सरकार स्थापन केलं. मात्र काही दिवसामध्ये ते सरकार पडलं. त्यानंतर पुन्हा मध्यंतरी निवडणुका लागल्याने 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी 67 जागा निवडून आणत दिल्लीत सरकार स्थापन केलं.

Arvind Kejriwal
Dhairyasheel Mane : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत धैर्यशील मानेंची थेट पंतप्रधानांकडे तक्रार; म्हणाले...

त्यानंतर 2021 मध्ये गुजरातच्या सुरत महापालिका निवडणुकीत 120 पैकी 'आप'27 जागा जिंकल्या. तर 2022 च्या पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 117 पैकी 92 जागा मिळवत सरकार स्थापन केलं. त्याचबरोबर 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत 40 जागांपैकी 2 जागा 'आप'ला निवडणून आणण्यात यश आलं. तर 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 5 जागेवर 'आप'ला विजय मिळाला. तसेच 2022 च्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'आप'ने सत्ता स्थापन केली.

Arvind Kejriwal
Shivsena : मनिषा कायंदेंवरच्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक : शेवाळेंविरूद्ध रस्त्यावर!

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat assembly elections) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ९२ पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र प्रत्येक्षात त्यांना 5 जागा मिळाल्या असल्या तरी आप आम आदमी पक्ष हळूहळू देशभरात वाढताना दिसत आहे. त्यामुळे पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंतची 'आप' घौडदौड पाहता येणाऱ्या काळात 'आप' राष्ट्रीय राजकारणात (National politics) दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com