Farmer flood Relief Fund : प्रशासनाचे दुर्लक्ष.., पण 'या' वृद्ध दांपत्याने दाखवली खरी देशभक्ती, थरथरत्या हाताने लाखोंची मदत!

Senior Citizens Help Marathwada Farmers in Flood Relief fund : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आपल्या परीने आपल्या कष्टातून मदत मिळावी, म्हणून लाखों रुपयांची मदत!
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnama
Published on
Updated on

राज्य सरकारकडे विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. याचे प्रत्यय अनेक घटनांमधून समोर येत आहेत. अशातच राज्यातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक संकटाने कंबरडे मोडले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आपल्या परीने आपल्या कष्टातून मदत मिळावी, हा हेतू घेऊन कोल्हापुरातील वृद्ध दांपत्य जिल्हा प्रशासनाकडं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन गेले.

मात्र जिल्हा प्रशासनाकडून त्यांची कोणतीच दखल घेतली नाही. अशी माहिती कोल्हापूरातून समोर आली आहे. त्यामुळे या वृद्ध दांपत्याने केंद्र सरकारकडेच पाठपुरावा करत मराठवाडा आणि उत्तराखंडच्या नुकसानग्रस्तांना ही मदत सुपूर्द केली. या वृद्ध दांपत्याला कोल्हापुरातील जिल्हा प्रशासनातील अधिकारांच्या निष्काळजीपणाला सामोरे जावे लागले याचे दुर्दैव वाटत आहे.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, येथील सेवानिवृत्त प्राध्यापक व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. डॉ. राम पणदूरकर आणि त्यांच्या पत्नी कोल्हापूरमध्ये राहतात. मुलीच्या निधनानंतर त्यांनी समाजसेवेचे व्रत जोपासत आतापर्यंत 65 लाखांचा निधी मदत म्हणून दिला आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या हेतूने या वृद्ध दांपत्याने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली.

.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांची मदत हे दाम्पत्य राज्य सरकारला देणार होते. मात्र जिल्हा प्रशासन पातळीवर त्यांनी या संदर्भात प्रयत्न केला असता कोणत्याही कार्यालयाकडून त्यांची दखल घेतली नाही. असा दावा पणदूरकर दांपत्याचा आहे. ही मदत करत असताना आम्ही जिल्ह्याच्या मुख्य प्रशासन अधिकारी देऊ, आमच्या या मदतीमुळे अनेक हात समोर येतील अशी भावना या दांपत्याची होती. मात्र जिल्ह्याचे मुख्य प्रशासन अधिकारीच बाहेर असल्याचं कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kolhapur News
Local Body Election Reservation : मोठी बातमी! नगराध्यक्ष आरक्षण जाहीर; बीड, शिर्डी, अकलूजसह 17 नगरपालिकांवर 'महिला राज', 'एससी'साठी राखीव!

वारंवार पत्रव्यवहार करून ही दखल घेत नसल्याने अखेर या दांपत्याने थेट केंद्र सरकारशी संवाद साधला. पंतप्रधान सहाय्यता निधीकडे त्यांनी दहा लाखाचा चेक प्रदान केला. ही मदत करत असताना या दांपत्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या मदतीचे प्राधान्य द्यावे अशी मागणी केली. एकीकडे राज्य सरकार नुकसानग्रस्त भागाला मदत मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांच्या नफ्यातून पैसे कपात करत आहे. तर दुसरीकडे सामान्य नागरिक मदतीसाठी पुढे येत असताना त्याची जिल्हा प्रशासनाकडून दखल न घेणे, हेच दुर्दैव असल्याची खंत या दांपत्याची आहे.

आतापर्यंत 75 लाखांची मदत

मराठवाडा व उत्तर भारत, भू:खलन व अतिवृष्टी ग्रस्त, बळीराजांसाठी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी, रुपये दहा लाखची देणगी नुकतीच, पीएमओ ,साऊथ ब्लॉक दिल्ली, येथे चेक द्वारे या दाम्पत्यांनी रवाना केली. यापूर्वी, दिनांक 8 मे 25 रोजी पहलगाम हल्ला, सिंदूर ऑपरेशनसाठी ,त्यांच्या सुविद्य पत्नी हेमकिरण पणदूरकर यांनी, रुपये 5 लाख देणगी 'राष्ट्रीय संरक्षण निधी'साठी दिले होते. पणदूरकर दामंपत्त्याची कन्या, रूपाली पणदूरकर यांच्या स्मृती प्रत्यर्थ ही देणगी देण्यात आली आहे.

Kolhapur News
मोठी बातमी : धाराशिव, माजलगाव, मालवणसह 67 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी राखीव; 34 मध्ये महिलाराज

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे 65 लाख देणगीसह उभे केले आहे . लहान मुलींच्या शिक्षणासाठी, सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी काही लाख रुपये देणगी दिली जाते. पणदूरकर दाम्पत्याचा, दातृत्वासाठी, समाज माध्यमे व समाजातील लोक, त्यांचे कृतज्ञ असून, इतर लोकांनी अशीच देणगी देशासाठी देऊन, राष्ट्राचे हात बळकट करावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com