श्रीरामपूर नगरपालिकेत आता प्रशासकराज

अहमदनगर जिल्ह्यातील ( Ahmednagar District ) काही नगरपालिकांची मुदत आगामी दोन दिवसांत संपत आहे.
shrirampur nagarparishad

shrirampur nagarparishad

Sarkarnama

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील ( Ahmednagar District ) काही नगरपालिकांची मुदत आगामी दोन दिवसांत संपत आहे. त्यात श्रीरामपूर ( Shrirampur ) नगरपालिकेचा समावेश आहे. मात्र कोरोनामुळे या निवडणुकांवरच प्रश्न चिन्ह पडल्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेत प्रशासकराज सुरू झाले आहे. Administrator now in Shrirampur Municipality

कोरोनामुळे सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे येथील नगरपालिकेत आता प्रशासकराज लागू झाला आहे. पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ काल (बुधवारी) संपल्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी आज (गुरुवारी) सकाळी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>shrirampur nagarparishad</p></div>
कोविड सेंटरवरून खडाजंगी, श्रीरामपूर पालिकेच्या सभेत गोंधळ

प्रांताधिकारी पवार यांनी पालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेत, विविध विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. निवडणुका लांबणीवर गेल्याने नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नुकतेच आदेश काढले होते. मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कळविले होते. त्यानुसार येथील पालिकेवर प्रांताधिकारी पवार यांना प्रशासकपदी नियुक्त करण्याचे आदेश निघाले होते.

<div class="paragraphs"><p>shrirampur nagarparishad</p></div>
राधाकृष्ण विखे पाटलांनाही कोरोनाची लागण

त्यानुसार प्रांताधिकारी पवार यांनी आज पदभार स्वीकारला आहे. पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून अनुराधा आदिक यांनी 27 डिसेंबर 2016 मध्ये पदभार स्वीकारला होता. नगराध्यक्षा आदिक यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाला होता. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. असा प्रस्ताव नुकताच विधानसभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील नगरपालिकेत पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासकराज राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com