Adinath Sugar Factory Election Result-sanjay shinde
Adinath Sugar Factory Election Result-sanjay shindeSarkarnama

Sanjay Shinde : मोठी बातमी : विधानसभेनंतर ‘आदिनाथ’च्या निवडणुकीतही संजय शिंदेंचा धक्कादायक पराभव

Adinath Sugar Factory Election Result : केम गटातून सर्वाधिक धक्कादायक निकाल असून माजी आमदार संजय शिंदे यांना पराभावाला समोरे जावे लागले आहे. केम हा भाग माढा तालुक्यालगत असूनही संजय शिंदे यांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे.
Published on

Solapur, 19 April : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील गटाने सत्ता काबीज करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. कारखान्याच्या २१ जागांपैकी २१ जागा जिंकल्या असून त्यातील राखीव गटाचा फक्त निकाल जाहीर करण्याचे बाकी आहे. मात्र, विधानसभेनंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही माजी आमदार संजय शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. केम गटातून शिंदेंना धक्कादायक पराभव झाला आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Adinath Sugar Factory Election) गुरुवारी ६०.७९ टक्के मतदान झाले होते. त्याची मोजणी आज (ता. १९ एप्रिल) सकाळी आठपासून करण्यात आली. त्यात पहिल्याच टप्प्यात आमदार नारायण पाटील गटाने पहिल्या टप्प्यात एक ते दीड हजार मतांची आघाडी घेतली होती. दुपारी दोनच्या सुमारास पहिला निकाल आला, तो नारायण पाटील यांच्या पॅनेलच्या बाजूने लागला.

जेऊर गटातून नारायण पाटील (Narayan Patil) गटाचे तीनही उमेदवार विजय झाली आहेत. त्यात दत्तात्रेय रामचंद्र गव्हाणे, महादेव श्रीपती पोरे, श्रीमान त्रिंबक चौधरी यांचा समावेश आहे. दत्तात्रेय गव्हाणे यांनी सर्वाधिक ८६०७ मते घेऊन जेऊर गटातून बाजी मारली आहे. महादेव पोरे यांना ८१९५, तर श्रीमान चौधरी यांना ८०६१ मते पडली आहेत.

पोमलवाडी गटातूनही आमदार नारायण पाटील गटाचे तीनही उमेदवार विजयी झाले. त्यात किरण कवडे, नवनाथ झोळ, संतोष पाटील यांचा समावेश आहे. सालसे ऊस उत्पादक गटातून आमदार पाटील गटाचे रविकिरण फुके, दशरथ हजारे, आबासाहेब अंबारे, तर केम गटातून दत्तात्रेय हरिश्चंद्र देशमुख, विजय जिजाबा नवले, महेंद्र दिनकर पाटील हे उमेदवार विजयी झाले आहेत.

Adinath Sugar Factory Election Result-sanjay shinde
Adinath Election Result : जेऊर गटातून नारायण पाटील गटाचे तीनही उमेदवार विजयी; विरोधी उमेदवारांचीही कडवी लढत

केम गटातून सर्वाधिक धक्कादायक निकाल असून माजी आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना पराभावाला समोरे जावे लागले आहे. केम हा भाग माढा तालुक्यालगत असूनही संजय शिंदे यांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे. विधानसभेनंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही पराभव झाल्याने शिंदेंसाठी तो चिंतनाचा विषय ठरणार आहे.

पोमलवाडी गटात

नारायण पाटील यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार

किरण कवडे - 8571

नवनाथ झोळ - 8343

संतोष पाटील - 8328

माजी आमदार संजय शिंदे गटाचे उमेदवार

दशरथ पाटील - 6701

बबन जाधव - 6837

नितीन राजे भोसले - 6708

सालसे ऊस उत्पादक गट :

नारायण पाटील यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार

1) रविकिरण फुके – 8232

2) दशरथ हजारे – 7933

3) आबासाहेब अंबारे – 8479

माजी आमदार संजय शिंदे गट

1) विलास जगदाळे - 6805

2) नागनाथ चिवटे – 7039

3) नवनाथ जगदाळे - 6805

Adinath Sugar Factory Election Result-sanjay shinde
Adinath Election Result : ‘आदिनाथ’च्या निवडणुकीत नारायण पाटलांचे पॅनेल दीड ते दोन हजार मतांनी आघाडीवर; संजय शिंदेंना पुन्हा धक्का

केम गट

नारायण पाटील यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार

दत्तात्रेय हरिश्चंद्र देशमुख ८६२५

विजय जिजाबा नवले ८१०६

महेंद्र दिनकर पाटील ८३३७

संजय शिंदे गटाचे उमेदवार

संजय शिंदे ७०६०

सोमनाथ नवनाथ रोकडे ६७७९

सोमनाथ चांगदेश देशमुख ६७२८

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com