Udayanraje-Shivendraraje Meets Fadanvis: वादानंतर साताऱ्याचे दोन्ही राजे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला...

Udayanraje - Shivendraraje Bhosale Meets Fadanvis: खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सकाळी कराड येथे येऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.
Udayanraje Bhosale, Devendra Fadanvis, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Devendra Fadanvis, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Karad News : सातारा बाजार समिती इमारतीच्या भूमिपूजनावरून काल सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले एकमेकांसमोर भिडले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल बुधवारपासून कराड दौऱ्यावर आहेत. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सकाळी कराड येथे येऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सुमारे तासभर स्वतंत्ररित्या झालेल्या चर्चेत कालच्या वादावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Satara APMC नूतन इमारतीची जागा माझी आहे, असे म्हणत काल खासदार उदयनराजे भाेसले Udayanraje Bhosale यांनी न्यायालयाचा अवमान हाेऊ नये याची खबरदारी पाेलिसांनी घ्यावी, असे आवाहन करत खिंडवाडीत भूमिपूजनाचा कायर्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale घटनास्थळी पाेहचले.

त्यांनी जागा मार्केट कमिटीच्या नावावर असल्याचे सांगत उदयनराजे आणि पाेलिसांच्या समोरच कार्यक्रमस्थळी नारळ फाेडत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा साेहळा पार पडून निघून गेले. यानंतर खासदार भाेसले यांनी घटनास्थळी त्यांच्या समर्थकांसमवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

त्यानंतर उदयनराजे भाेसले यांनी संभाजीनगर ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना विविध विकासकामांसाठी जागा नाही. त्यासाठी त्यांनी आम्हांला या जागेची मागणी केली. त्या जागेत संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठीच्या विविध विकास कामांसाठीचे भूमिपूजन केले.

Udayanraje Bhosale, Devendra Fadanvis, Shivendraraje Bhosale
PI Transfers in Pune : पोलिस आयुक्तांचे आदेश; शहरातील 14 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सातारा येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला दोन्ही राजे कराडमध्ये दाखल झाले आहेत. खासदार भोसले व आमदार भोसले यांनी स्वतंत्ररित्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना कालच्या राड्याची माहिती दिल्याचे समजते. या राडा प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com