नातेपुते (जि. सोलापूर) : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर भाजप-शिवसेनेमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस निर्माण होईल, अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे. राज्यातील अनेक देवस्थानांवर विश्वस्त म्हणून आपलीच नेमणूक व्हावी, यासाठी अनेक संत महात्म्यांनी भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठांकडे मागील अनेक महिन्यांपासून संपर्क साधलेला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात निकाल काय होतो? या कारणामुळे या विश्वस्त पदांवर आजपर्यंत नेमणुका झालेल्या नव्हत्या. तो मार्ग आता खुला झाला आहे. विशेषतः पंढरपूर, आळंदी, शिर्डी देवस्थानावर अनेकांचा डोळा आहे. (After the verdict of Supreme Court, the power struggle between BJP and Shiv Sena will increase)
राज्यातील अनेक महामंडळे पदाधिकाऱ्यांविना पोरकी आहेत. राज्यातील अनेक महामंडळात आर्थिकदृष्ट्या खळखळाट आहे. परंतु मानाचे पद म्हणून कार्यकर्त्यांना आणि जे आमदार होऊ शकले नाहीत, अशा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना महामंडळे दिली म्हणजे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते, हे लक्षात घेऊन या महामंडळांवर कुणाची वर्णी लागणार, हेही या महिन्याभरात स्पष्ट होईल असे वाटते.
मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागणार का?
सध्या भाजप (BJP), शिवसेनेच्या (Shivsena शिंदे गट) अनेकांना वाटते की, मंत्रिमंडळ विस्तारात माझाच नंबर लागणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामुळे प्रत्येक जण वेटिंग लिस्टवरच होता. तोही मार्ग आता खुला झाला आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठींना याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे.
विशेषतः सोलापूर जिल्ह्यातून किमान दोन जण तरी मंत्रिमंडळात जातील, असे वातावरण आहे. शहरातील जुन्यांना संधी मिळणार की? ग्रामीण भागातून कुणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच काय तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, प्रत्येकाला त्यांनी शब्द दिलेला आहे असे समजते. त्यामुळे सत्ता स्पर्धेत कोण यशस्वी होणार हे लवकरच दिसून येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.