Nagar Politics : नगर नव्हे अहिल्यानगर; सुळेंचा दौरा अन् प्राजक्त तनपुरेंच्या ट्विटची चर्चा

Prajkta Tanpure News : नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर व्हावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून आहे.
Nagar Politics :
Nagar Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर व्हावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी (९ ऑक्टोबर) नगर दाैऱ्यावर हाेत्या. सुप्रिया सुळे यांच्यासाेबत या दाैऱ्यात महाविकास आघाडीसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पदाधिकारीदेखील हाेते.

यात नगर जिल्ह्याचे प्रभारी आमदार प्राजक्त तनपुरे हेदेखील हाेते. सुप्रिया सुळे या पाथर्डीच्या दिशेने चालल्या असताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर पाेस्ट शेअर केली हाेती. ही पाेस्ट लिहिताना प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर', असे लिहिले आहे. प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा सुप्रिया सुळे दाैऱ्यावर असताना चर्चेत आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता रंगली आहे.

Nagar Politics :
Sanjay Singh Liquor Scam : 'मला वर पाठवण्याची तयारी होती'; संजय सिंहांच्या आरोपाने खळबळ !

सोशल मीडियावरील पोस्टवर अहिल्यानगर उल्लेख

सुप्रिया सुळे या पाथर्डीच्या दिशेने जात असताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. याची माहिती प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पाेस्ट शेअर केली हाेती. पाेस्टची सुरुवात करताना त्यांनी, ''अहिल्यानगर' जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असलेल्या आदरणीय खासदार सुप्रिया सुळे..,' असे म्हटले आहे. प्राजक्त तनपुरे यांनी अहमदनगर हे नाव वगळून थेट 'अहिल्यानगर', असा उल्लेख केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

पाेस्टची सुरुवात 'अहिल्यानगर', असा केल्याने काहींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी ही पाेस्ट राष्ट्रवादीच्या 'एक्स' खात्याबराेबरच खासदार सुप्रिया सुळे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राेहिणी खडसे यांना टॅग केली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या या पाेस्टवर काहींनी, ''अहिल्यानगर' हे अधिकृत नाव आहे का?', असा प्रश्न केला आहे, तर काहींनी 'राष्ट्रवादीकडून 'अहिल्यानगर' झाले तर..', अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. तसा ताे राजकीय साेयीने चर्चेत आणला जाताे. औरंगाबाद, उस्मानाबाद यांचे नामांतर झाल्यानंतर नगरच्या नामांतरचा मुद्दादेखील चर्चेत आला हाेता. जामखेड तालुक्यातील चाैंडी येथे पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात 31 मे राेजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर जिल्ह्याचे 'पुण्यश्लाेक अहिल्यादेवी', असे नामांतर झाल्याची घाेषणा केली हाेती.

मात्र, नामांतरच्या घाेषणेची अधिकृत, अशी अधिसूचना सरकारकडून अजूनही निघालेली नाही. तसे पाहिल्यास नामांतराचा मुद्दा आता थंडावला आहे. असे असतानाच प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर जिल्ह्याचा 'अहिल्यानगर', असा उल्लेख केला आहे. प्राजक्त तनपुरे यांनी नगरचा 'अहिल्यानगर' असा उल्लेख आता करण्याचे कारण काय, अशी चर्चा रंगली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com