Shivaji Maharaj Controversial Video Clip : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्याला अटक

Nagar Crime News : अरमान नईम शेख असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
Mumbai Police
Mumbai Police Sarkarnama
Published on
Updated on

Nagar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना शनिवारी रात्री नगरमध्ये घडली. संबंधित तरुणाला जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने मुकुंदनगर भागातून ताब्यात घेतले आहे. अरमान नईम शेख असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तातडीने तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने अरमान नईम शेख याला ताब्यात घेतले.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गर्दी केली. त्या युवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

Mumbai Police
Congress Vs NCP : इस्लामपुरातील कार्यालय नक्की कोणाचे ? दोन्ही काँग्रेसमधील वाद चिघळणार...

दोन महिन्यांपूर्वीच मुकुंदनगर भागात उरूस मिरवणुकीचे औरंगजेबचे पोस्टर्स नाचत झकळवण्यात आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले. दोन दिवसांपूर्वी मोहरम मिरवणुकीत पोलीस उपनिरीक्षकाला खांद्यावर घेऊन नाचल्या बद्दल अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला. औरंगजेबचे स्टेट्स ठेवण्याचे प्रकारला घडला.

Mumbai Police
Sudhir Mungantiwar Claims Congress Leaders : काँग्रेस नेत्यांच्या BJP प्रवेशावर मुनगंटीवार म्हणतात, "फडणवीसांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला...

संगमनेर, कोपरगाव, राहुरी आदी ठिकाणी लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतराच्या घटनानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत. तर सकल समाजाच्या मोर्च्यांत उपस्थित नेते भडकवणारी वक्तव्ये करत असल्याचा आरोप होत आहे. या बद्दल कारवाईची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com