Ahmednagar Crime News : धार्मिक स्थळाच्या कमानीचा रंग बदलण्याचा प्रयत्न, समाजकंटक पसार...

Ahmednagar Crime News : सामाजित वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Ahmednagar Crime News :
Ahmednagar Crime News : Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ दोन्ही गावच्या सीमेवरील धार्मिक स्थळासमोरील कमानीचा रंग समाजकंटकांनी रातोरात बदल्याचा प्रकार झाला. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. अमीर दादाभाई इनामदार (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दोन समाजात तेढ निर्माण करून सामाजित वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime News :
Bhandara Crime : धक्कादायक! नईम शेखच्या हत्येनंतर आरोपी गेले राजकीय नेत्याच्या घरी

राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ या दोन्ही गावाच्या सीमेवर मियाँसाहेब बाबा पादुका हे धार्मिक स्थळ आहे. तसेच, त्या शेजारील रस्त्यावर एक कमान आहे. साजीद शेख हे मंगळवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजता हे राहुरीकडून टाकळीमियाँ रस्त्याने जात होते. त्यावेळी सदर दर्गा आणि कमानीला काही समाजकंटक रंग देत होते. साजीद शेख यांना पाहून ते समाजकंटक घटनास्थळावरून पसार झाले. साजीद शेख यांनी सदर घटनेची माहिती दर्गाचे पुजारी अमीर दादाभाई इनामदार यांना दिली. (Latest Crime News)

या प्रकाराची माहिती गावात पसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १७) धार्मिक स्थळी लोकांनी गर्दी केली होती. यातून दोन्ही गावात तणाव निर्माण झाला होता. राहुरी पोलिसांनी या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पदभार स्वीकारताच हा जातीय तणाव निर्माणाचा प्रकार समोर आले. त्यामुळे निरीक्षक ठेंगे या प्रकारावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तणावाच्या परिस्थितीमुळे पोलिसांचा फौजफाटा गावातच तैनात आहे. तसेच, दंगल नियंत्रण पथकाचा घटनास्थळावर बंदोबस्त आहे.

Ahmednagar Crime News :
Crime News : क्राईम सेन्स डु नाॅट क्रॉस; 'महाराष्ट्रात गुंडाराज'

हिंदू व मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून जातीवाद तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र काही समाजकंटकांकडून करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. मात्र, पोलिस प्रशासनाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या वाघाचा आखाडा व टाकळीमियाॅ या दोन्ही गावात शांतता असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com