Bhandara Crime : धक्कादायक! नईम शेखच्या हत्येनंतर आरोपी गेले राजकीय नेत्याच्या घरी

Naim Murder Case : घटनेमागे राजकीय षड्यंत्राचा संशय बळावला; रक्ताने माखलेले कपडे बदलविले...
Naim Shekh Murder Case.
Naim Shekh Murder Case.Sarkarnama
Published on
Updated on

Tumsar : मोक्का प्रकरणातील सराईत आरोपी नईम शेखची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना 25 सप्टेंबरला घडली होती. याप्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नईमच्या खून प्रकरणात नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. नईमच्या हत्येनंतर आरोपी चक्क एका राजकीय नेत्याच्या घरी गेल्याचे पुढे आले आहे.

हत्येनंतर रक्ताने माखलेले कपडे बदलविण्यासाठी ते या नेत्यांच्या घरी गेले होते. त्यांनी तेथे दुसरे कपडे घालून बाहेर पडल्याची माहिती विश्वसनीय माहिती ‘सरकारनामा’च्या हाती लागली आहे. त्यामुळे या हत्येत ‘त्या’ नेत्यांचा प्रत्यक्ष सहभाग तर नाही ना? अशी चर्चा आता भंडारा जिल्ह्यात रंगली आहे. राजकारणाचे होत असलेले गुन्हेगारी परिवर्तन चिंतेचा विषय ठरत आहे.

Naim Shekh Murder Case.
Bhandara : कार्यकर्त्यांच्या कुपोषणाचा मुद्दा; महायुतीतून कोण देणार, याकडे लक्ष?

बालाघाट तिरोडीवरून 25 सप्टेंबरला नईम शेख आपल्या साथीदार कालू माटे, जावेद पठाण आणि शहीद पठाण यांच्यासोबत चारचाकी वाहनाने तुमसरकडे येत होते. संतोष दहाट आपल्या सात साथीदारांसोबत त्यांचा पाठलाग करत होता. गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ येताच ड्रायव्हरच्या बाजुला बसलेल्या नईम खानवर सुरुवातीला गोळी झाडण्यात आली.

पहिली गोळी कारच्या दाराला लागली. कार थांबवून नईम शेखवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी नईमचे तीनही साथीदार पळून गेले. नईम मेल्याचे समजताच संतोष दहाट व त्याचे साथीदार घटना स्थळावरून पळून गेले. पुढे मृतक नईमच्या साथीदारांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याप्रकरणी पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी उत्तम कामगिरी करत स्वत: लक्ष देत 14 आरोपींपैकी 12 आरोपींना अटक केली. त्यांनी संतोष दहाटने हत्याकांड घडवून आणल्याचे कबूल केले. अटक आरोपीत संतोष चंदन दहाट, सतीश चंदन दहाट, शुभम पंधरे, गुणवंत यवकार, आशिष नेवारे, रवी रतन बोरकर, दिलखुश कोल्हाटकर, अमन मेश्राम, आशुतोष घड़ले, सचिन भोयर, विशाल मानेकर, विनेक सांडेकर, नरेंद्र पीपरधरे, सुरेंद्र पीपरधरे यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक मतानी यांनी वरील सर्व आरोपींवर मोक्काही लावला आहे.

या सर्व घडामोडीत भंडारा जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याचे नाव समोर आले आहे. त्याने यातील 12 आरोपींना घरी कपडे बदलण्याची मुभा दिली होती. त्या नेत्यांची चौकशीही सुरू झाली आहे. या नेत्यावर आणखी एका बड्या नेत्याचा वरदहस्त आहे. त्या बड्या नेत्याला खुश करण्यासाठी हा आरोपी नेता तुमसर- मोहाडी क्षेत्रात नेहमी ‘बॅनरबाजी’ करीत असतो. त्यामुळे या नेत्याला ‘त्या’ बड्या नेत्याचे अभय तर याप्रकरणाला नाही ना? अशी चर्चा आता भंडाऱ्यात रंगत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Naim Shekh Murder Case.
Bhandara : न्यायालयाने दूर केला अपात्रतेचा पाश; गोंडीटोला सरपंचनिवडीचा मार्ग मोकळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com