Ganesh Sakhar Karkhana : नगरच्या राजकारणात 'गणेश' ठरतोय कळीचा मुद्दा; काय आहे कारण?

Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात-विवेक कोल्हेंच्या उपस्थितीत कारखान्याची सर्वसाधारण सभा
Vivek Kolhe, Balasaheb Thorat, Radhakrishna Vike
Vivek Kolhe, Balasaheb Thorat, Radhakrishna VikeSarkarnama

सेAhmednagar Political News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या राहाता तालुक्यातील श्री गणेश साखर कारखान्यावर त्यांची आठ-दहा वर्षे एकहाती सत्ता होती. ती सत्ता काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांनी एकत्र येत हिरावून घेतली. थोरात-कोल्हे आणि विखेंच्या चढाओढीत नगरच्या राजकारणात गणेश कारखाना कळीचा मुद्दा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणारी कारखान्याची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. यात कारखान्याबाबत काय निर्णय होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. (Latest Political News)

'श्रीगणेश'ची निवडणूक संपली असली तरी विखे विरुद्ध थोरात-कोल्हे राजकीय आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. 'श्रीगणेश'साठी चालू गळीत हंगामासाठी लागणारे कर्ज मिळण्यात राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) अडचणी आणत असल्याचा आरोप कारखान्याच्या संचालक मंडळाने केला आहे. थोरात-कोल्हेंना सोबत घेत संचालक मंडळाने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून कर्जासाठी विनंती केली होती. त्यामुळे संगमनेर, राहाता आणि कोपरगावमधील राजकारण तापले आहे. दररोज विखे-थोरातांच्या वतीने आजी-माजी संचालक मंडळ आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Vivek Kolhe, Balasaheb Thorat, Radhakrishna Vike
OBC Andolan News : जातीनिहाय जनगणनेसाठी सरकारवर दबाव आणणार ; ओबीसी आंदोलनात इशारा

याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे यांनी स्वाभिमानी गणेश परिसरासाठी होऊ घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार असल्याचे सांगितले आहे. 'गेले दहा वर्षे गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय तसेच दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच झालेल्या गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला. गणेश कारखाना सभासदांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल,' असा विश्वास लहारे यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Political News )

'श्री गणेश हा निव्वळ कारखाना नसून राहाता तालुक्याच्या विकासाची कामधेनू आहे. गणेश कारखान्यावर ७२ कोटींचा दावा ठोकून प्रवरा सहकारी साखर कारखान्याने गणेश समोर संकटांची मालिका उभी केली आहे. कारखाना बंद ठेवून या परिसरातला ऊस हडप करण्याचा डाव प्रवरा कारखान्याच्या नेतृत्वाचा दिसतो,' असा आरोप लहारे यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या तोफा धडाडणार आहेत. येणारे पुढील वर्ष हे लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे आहे. जिल्ह्यात विखे-थोरात-काळे-कोल्हे हे साखर पट्ट्यातील मोठे नेते यानिमित्ताने आपापल्या राजकीय सोयीने आणि मतदारसंघासह जिल्हावार एकहाती वर्चस्व ठेवण्यासाठी सरसावले आहेत. या सर्व राजकीय वादळाचा केंद्रबिंदू 'श्रीगणेश' ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Vivek Kolhe, Balasaheb Thorat, Radhakrishna Vike
Akola Crime News : बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींसह सचिवाला लाच घेणं भोवलं; 'लाचलुचपत'ची मोठी कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com