Akola Crime News : बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींसह सचिवाला लाच घेणं भोवलं; 'लाचलुचपत'ची मोठी कारवाई

Anti Corruption Bureau News : लाचखोर सभापती 'वंचित'चा तर...
Anti Corruption News
Anti Corruption News Sarkarnama
Published on
Updated on

Akola News : अकोला, जिल्ह्यातील तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. बाजार समितीचा सभापती, उपसभापतीसह सचिव या तिघांना एक लाखाची रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(Anti Corruption Bureau) च्या सापळ्यात तिघेही अडकले असून त्यांना अटक करून तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले आणि सचिव सुरेश सोनोने अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराचे कंत्राटचे बिल काढण्यासाठी या तिघांनी लाचेची मागणी केली होती.

Anti Corruption News
Chandrapur Politics : भाजप प्रवेशाच्या श्रेयवादाची लढाई टोकदार; 'हे' आहे कारण ?

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती ही पदे एकंदरीत मानाचे आणि तेवढेच कमाईचे असल्याने बाजार समितीची खुर्ची मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र, हीच पदे लाचखोर पदाधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहेत.

तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सभापती,उपसभापती आणि सचिव हे हजर सभेपूर्वी या प्रकरणातील तक्रारदार यांच्याकडून उपसभापती यांनी एक लाख रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. लाचेला प्रोत्साहन दिल्याने सभापती, सचिव यांनाही अटक करण्यात आली.

लाचखोर सभापती 'वंचित'चा तर...

तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सभापतीपदी सुनील इंगळे तर उपसभापती प्रा. प्रदीप ढोले हे विजयी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने(Vanchit Bahujan Aaghadi) सहकार पॅनलच्या मदतीने सभापतीपद आपल्याकडे खेचून आणले होते. तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष सहकार नेते प्रदीप ढोले हे निवडून आले होते. दरम्यान या कारवाईमुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

'अशी' केली अकोला एसीबीने कारवाई...

या प्रकरणातील तक्रारदार यांनी कोरोना काळात बाजार समितीला हमाल पुरवण्याचा कंत्राट घेतला होता. या कंत्राटचे १४ लाख ३९ हजार ५९२ रुपये बाजार समितीकडे थकीत होते. दरम्यान बाजार समितीने तक्रारदाराला ४ लाख ९३ हजार रुपये रोख दिले होते. मात्र ९ लाख ४६ हजार ५९२ रुपये तक्रारदाराचे बाजार समितीकडे बाकी होते. बाकी असलेल्या रकमेचे बिल काढण्यासाठी तक्रारदार हे बाजार समितीत चकरा मारत होते.

Anti Corruption News
Devdatta Nikam News : वळसे पाटलांची साथ सोडलेल्या नेत्यावर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी...

दरम्यान, थकीत बिलासाठी एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी सभापती, उपसभापती आणि सचिव यांनी तक्रारदाराकडे केली होती. दरम्यान तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने याची तक्रार अकोला येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती. दरम्यान सोमवारी एसीबीचे अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बाजार समिती परिसरात सापळा रचून ही कारवाई केली आहे. यावेळी उपसभापती यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. (Crime News)

सोमवारी तिघेही बाजार समितीत सभेसाठी आले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती व पोलीस उपअधीक्षक बी. शैलेश सपकाळ एसीबी अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, निलेश शेगोकार, संदीप ताले, किशोर पवार, अभय बावस्कर, सुनिल येलोने, पो. हवा. पुरुषोत्तम मिसुरकर, मपो हवा अर्चना पोडेस्वार व चालक सहा. पो. उपनि दिलीप तिवळकर यांच्या पथकाने केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Anti Corruption News
Dhangar Reservation Protest : सरकारसमोरचं संकट वाढलं; यशवंत सेनेच्या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली,मंत्री महाजन चौंडीला जाणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com