Rashtrapati Bhavan : साई संस्थानचे आचारी राष्ट्रपतींसाठी मराठमोळे चविष्ट जेवण बनवणार..

Saibaba Sansthan News : रविंद्र वहाडणे, प्रल्हाद कर्डीले अशी त्यांची नावे आहेत.
Saibaba Sansthan News
Saibaba Sansthan News Sarkarnama
Published on
Updated on

Nagar : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यांनी साई प्रसादलयात जेवणाचा आस्वाद घेतला. येथे जेवण बनवणाऱ्या साई संस्थानच्या दोन्ही आचार्यांना थेट राष्ट्रपती भवनात मराठमोळे जेवण बनवण्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. हे आचारी आता राष्ट्रपतींसाठी चविष्ट जेवण बनवणार आहेत. रविंद्र वहाडणे, प्रल्हाद कर्डीले असे या आचार्यांची नावे आहेत.

राष्ट्रपती भवनातून एका अधिकाऱ्याने थेट दूरध्वनी वरून साई संस्थानच्या अधिकार्‍यांशी याबाबत संपर्क साधला. राष्ट्रपतींसाठी मराठमोळ्या जेवण बनवणाऱ्या साई प्रसादलयातील या दोन्ही आचार्यांना राष्ट्रपती भवनात जेवण बनविण्यासाठी काही दिवसांसाठी पाठवण्यात यावे, असे निमंत्रण साई संस्थानला दिले आहे.

Saibaba Sansthan News
Praful Patel advice to Rohit Pawar प्रफुल्ल पटेलांचा सल्ला रोहित पवार ऐकणार का ? ; अजितदादांना शुभेच्छा देणार का ?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिर्डीला आल्या होत्या, तेव्हा त्यांना वाढण्यात आलेल्या शेंगदाणे चटणीची माहितीही त्यांनी त्याच्याबरोबर असलेल्या आचार्यांकडून जाणून घेण्यास सांगितले होते. राष्ट्रपतींनी या दोघांच्याही हातचे जेवण आवडल्याचे त्यांना राष्ट्रपती भवनात बोलवण्यात आले आहे.

मराठमोळे जेवण तयार करण्यासाठी हे दोघे आज (शनिवारी) दिल्लीला रवाना होणार आहेत. हे दोन्हीही आचारी खास महाराष्ट्रीयन पदार्थ विशेषत: शेंगदाण्याची चटणी तेथील आचार्य़ांना शिकवणार असल्याची माहिती आहे. गेल्या सात जुलै रोजी राष्ट्रपती या शिर्डीत आल्या होत्या.

Saibaba Sansthan News
Rohit Pawar Video Goes Viral : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून रोहित पवारांचा Video होतोय व्हायरल : काय आहे प्रकरण ?

राष्ट्रपतींसाठी शिर्डीत जेवणाचा असा होता मेनु....

मटकी हुसळ.

मेथीची भाजी.

आलू जिरा सुका.

साधी दाळ.

भात.

शिरा. लाडू

चपाती.

पापड.

शेंगदाण्याची चटणी.

दही.

सलाड.

वडापाव.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com