Sujay Vikhe Patil: सुजय विखेंना जिवे मारण्याची धमकी; सभेतच लावली ऑडिओ क्लिप...

Ahmednagar Lok Sabha 2024: ऑडिओ क्लिपबाबत बोलताना किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मात्र सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. 4 जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, असे विखे म्हणाले.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Nagar News: अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीचा (Ahmednagar Lok Sabha Constituency 2024) प्रचार आता अधिक रंगतदार होत आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांना (Sujay Vikhe Patil) दुसऱ्यांदा खासदार व्हायचंय आहे. त्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. त्यांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप कामोठेतील सभेत लावण्यात आली. या क्लिपमधील शिव्या देणारा व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य तथा नीलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मात्र सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. 4 जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, असे विखे म्हणाले.

पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी दहशतीत आयुष्य जगलं, मात्र आता तुम्हाला दहशतीत जगू देणार नाही. पारनेर आणि अहिल्यादेवीनगरच्या जनतेला दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभेत जात असल्याचे सुजय विखे पाटीलांनी पनवेल येथे झालेल्या सभेत सांगितले. विखेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांची नाराजी दूर करण्यात खासदार सुजय विखे पाटलांना यश आले आहे. शिर्डी मतदारसंघात मात्र विखे आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe)या एकाच पक्षात असणाऱ्या राजकीय विरोधकांचे सूत मात्र जुळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोल्हेंची नाराजी कशी दूर करायची हे विखेंसमोर आवाहन आहे.

महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात शनिवारी सायंकाळी मेळावा झाला. मेळाव्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता काळे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

R

Sujay Vikhe Patil
Arvind Kejriwal News: केजरीवालांच्या अटकेनंतरही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवलं; कोल्हापुरात सामूहिक उपोषण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com