Kolhapur: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना ईडीने (ED)अटक केली आहे. याला महिना उलटला असतानादेखील कोल्हापुरात (Kolhapur) आजही त्याबाबत तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला जातोय.
आम आदमी पार्टीने (AAP) आज याविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करत सामूहिक उपोषण केले. याचाच पुढचा भाग म्हणून आम आदमी पार्टीने देशभरात एकदिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला. या वेळी सत्ताधारी भाजपचा (BJP) त्यांनी निषेध व्यक्त केला.
यापूर्वी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांना अटक झाली होती. ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता. केजरीवालांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. आपने आज देशभरात सामूहिक उपोषणाचे आयोजन करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला. ईडीकडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्याने आपचे खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या नेत्यांनादेखील केवळ राजकीय सुद्बुद्धीने अटक केली असून, गुन्हा सिद्ध करताना ईडी तोंडावर पडणार असल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.
या वेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळोखे, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, आदम शेख, विजय हेगडे, प्रसाद सुतार, समीर लतीफ, संजय नलवडे, डॉ. कुमाजी पाटील, रमेश कोळी, राकेश गायकवाड, प्रथमेश सूर्यवंशी, अमरसिंह दळवी, आनंदा चौगुले, ईलाही शेख, आनंदराव वणिरे, विवेक भालेराव, मनोहर नाटकर, उमेश वडर, स्वप्नील काळे आदी उपस्थित होते.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.