Ahmednagar news : राम शिंदेंच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचा फोन आला, अन्...

बाजार समिती निवडणुकीच्या दृष्टीने राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.
Ram Shinde | Devendra Fadanvis
Ram Shinde | Devendra Fadanvis

Ahmednagar News : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांपैकी 12 बाजार समित्यांची निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार राम शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिंदे बोलत असतानाच अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा फोन आला. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत फडणवीसांना विनंती केली. त्यामुळे फडणवीसांनी फोनवरूनच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बाजार समिती निवडणुकीच्या दृष्टीने राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे उभे राहिले. त्वेषात भाषण सुरू असतानाच अचानक फडणवीसांचा फोन आला. त्यांनी फोन उचलला. आणि सध्या बाजार समिती निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत फडणवीसांना विनंती केली.

Ram Shinde | Devendra Fadanvis
Sanjay Raut News; `त्या` नगरसेवकांसाठी शिवसेनेचे दार कायमचे बंद झाले!

ही विनंती फडणवीस यांनी मान्य केली. त्यांनी तो मोबाईल.कार्यकर्त्यांसमोर धरत स्पिकरवर लावला. फडणवीसांनी सांगितले की, राम शिंदे यांनी विषय सांगितला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वांना अधिक मेहनत करायची आहे. सर्वांनी एकत्रित रहायचे आहे. आणि बाजार समितीची निवडणूक जिंकायची आहे, असा संदेश त्यांनी दिला.

दरम्यान, आमदार राम शिंदे यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जामखेड बाजार समितीच्या निवडणूक नियोजनासाठी चौडी येथे जामखेड तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी निवडणुकीत सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी, असा सुर या बैठकीत निघाला. तर जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून यासर्वांना विश्वासात घेऊन पुढील रणनिती ठरवण्यात येईल, ही निवडणूक जामखेडमध्ये परिवर्तनाची नांदी ठरणार आहे, असा विश्वास यावेळी राम शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच, गावोगावच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावावी आणि उमेदवाराला जिंकून आणावे. पण उमेदवार निवडताना कोणाचाही वशिला चालणार नाही, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे, असही शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com