Ahmednagar Politics News : आमदार थोरातांनी जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून सत्ताधारी भाजपला सुनावले

Balasaheb Thorat News : आमदार बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून सत्ताधारी भाजपला सुनावले आहे.
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Vivek Kolhe
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Vivek KolheSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे

Ahmednagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून सत्ताधारी भाजपला सुनावले आहे. "श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बॅंकेकडून मंजूर झालेले कर्ज ऐनवेळी थांबले गेले, पण न्यायालयाने न्याय दिला. जिल्हा बॅंक राजकारण करण्याची जागा नाही; परंतु बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी ते सुरू केले आहे," असा आरोप आमदार थारोत यांनी केला आहे. नगर जिल्हा सहकारी बॅंकेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले हे बॅंकेचे अध्यक्ष आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, साकुरी संस्थानच्या कन्या माधवी गुरुगोदावरी यांच्या उपस्थित झाला. आमदार थोरात यांनी त्यावेळी जिल्हा बॅंकेतील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधाला. संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते, सुधीर म्हस्के, सचिन गुजर, डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, जयराज दंडवते, अ‍ॅड. पंकज लोंढे, सुरेश थोरात, सचिन चौगुले, श्रीकांत मापारी, अनुप दंडवते, नितीन सदाफळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कार्यकारी संचालक नितीन भोसले उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Vivek Kolhe
Marathwada Political News : जायकवाडीला पाणी कधी सोडणार? टोपेंचा कोर्टात जाण्याचा इशारा; खोतकर मुख्यमंत्र्यांना भेटणार

जिल्हा बॅंकेने गणेश कारखान्याचे कर्ज रोखले असल्याची माहिती थोरात यांनी दिली. ते म्हणाले, "गणेश समोर रोज नवीन अडचणी निर्माण केल्या जात आहेत. गणेशला 40 कोटींचे कर्ज हवे होते. परंतु जिल्हा बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी तिथे राजकारण केले. विभागीय साखर सहसंचालकांनी बॅंकेला पत्र दिले आणि कर्ज थांबले. तसे कर्ज थांबवण्याचे काहीच कारण नव्हते. यावर न्यायालयात याचिका दाखल केली. तिथे जिल्हा बॅंकेला न्यायालयाने झापले. हेच 40 कोटी हाताशी असते, तर अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या" सहकारात काम करताना जिल्हा बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी कधीच राजकारण केले नाही.

विवेक कोल्हे हे भाजपमध्ये (BJP) होते. त्यावेळी आम्ही तडजोड केली. आमदार अशुतोष काळे, भानुदास मुरकुटे, (कै.) जयंत ससाणे या सर्वांशी आम्ही सहकार काम करताना तडजोडीने वागलो. मात्र, बॅंकेत राजकारण कधी आणले नाही. पण आता दुर्दैवाने तसे होत आहे, असेही आमदार थोरात म्हणाले. गणेशसाठी आपली सर्वांची जबाबदारी वाढल्याचे सांगून परिसरातील शेतकरी आणि सभासदांनी गणेशलाच ऊस दिला पाहिजे, असेही थोरात यांनी या वेळी सांगितले. या वेळी गणेशच्या सभासदांना मोफत साखर वाटप करण्यात आली.

पिक्चर अभी बाकी है : विवेक कोल्हे

विवेक कोल्हे यांनी गणेशचा हा हंगाम आव्हानात्मक आहे. अडचणीवर मात करत आलो, बँकेचे मंजूर असलेले कर्ज मिळाले नाही. सहकारी साखर कारखानदारींचा पाया ज्यांनी रचला त्यांच्या वारसदारांनी संकुचित विचार ठेवला. एखादी संस्था किंवा सहकार चळवळ कशी मोडीत निघेल, याच्यासाठी बारीकपणाने लक्ष घातले, असा गंभीर आरोप विखेंचे नाव न घेता केला. न्यायालयीन लढ्यात गणेश जिंकला आहे. कर्जासाठी निकाल लागला आहे. कोणताही करार अस्तित्वात नसताना जिल्हा बँकेला पत्र दिलेच कसे ? असा प्रकार आता समोर आला आहे. 'यह अभी शुरुवात है, पिक्चर अभी बाकी है', असे म्हणत विवेक कोल्हे यांनी संघर्षाची तयारी दाखवली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Vivek Kolhe
Bhandardara-Nilwande : जायकवाडीकडे पाणी झेपावणार; आमदार गडाखांच्या नेवासेत जमावबंदी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com