Bhandardara-Nilwande : जायकवाडीकडे पाणी झेपावणार; आमदार गडाखांच्या नेवासेत जमावबंदी

Water Issue : भंडारदरा आणि निळवंडे धरणातून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याच्या आदेशाला नगर जिल्ह्यातून राजकीय विरोध वाढला आहे.
Bhandardara-Nilwande :
Bhandardara-Nilwande : Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : भंडारदरा आणि निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याच्या आदेशाला नगर जिल्ह्यातून राजकीय विरोध वाढला आहे. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासे तालुक्यांतील तीव्र राजकीय विरोध झाला आहे. यातच जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची तयारी केली आहे. यासाठी प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. जायकवाडीच्या पाण्यावरून नगर (Nagar) जिल्ह्यात जलसंपदा विभागाविरोधात राजकीय संघर्ष तीव्र होणार असल्याची ही चिन्हे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhandardara-Nilwande :
Marathwada Political News : जायकवाडीला पाणी कधी सोडणार? टोपेंचा कोर्टात जाण्याचा इशारा; खोतकर मुख्यमंत्र्यांना भेटणार

- नगरमध्ये जमावबंदी

नगर जिल्हा प्रशासनाकडून ही जमावबंदी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासा तालुक्यात केली आहे. त्यामुळे नेवासे तालुक्यातून यावर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आमदार गडाख यांनी गुरुवारी नेवासा येथे जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले होते. (Nagar Political News)

जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील आणि कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना यासंदर्भातले निवेदन दिले होते. असे असले तरी जायकवाडीला प्रवरा नदीच्या सांडव्याद्वारे पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाकडून कार्यवाही पूर्ण झाली आहे. यामुळे प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी हा आदेश काढला आहे.

- कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

जायकवाडीच्या धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळया (बर्गे) काढण्यात येणार आहेत. नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात शेतकरी बर्गे टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसेच सदर प्रवाह कालावधीत लाभधारकांकडून अनिधकृत पाणी उपसा करण्याची शक्यताही आहे. यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध होऊ शकतो. (Bhandardara- Nilwande)

दमदाटी आणि मारहाण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा आदेश काढण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या आदेशानुसार कोणालाही प्रतिबंधित ठिकाणी गर्दी करता येणार नाही. तसेच संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Bhandardara-Nilwande :
Maratha Reservation News : उपोषण स्थगित, मग आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांचे काय ?

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचाली आणि फिरण्यावर निर्बंध प्रशासनाने घातले आहेत. निर्बंधांच्या कालावधीत परिसरात पाटबंधारे विभागाच्या नगर कार्यालयाचे अधिकारीच कार्यरत राहतील, असेही आदेश म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Bhandardara-Nilwande :
Maratha Reservation News : मराठा आंदोलक दाम्पत्याच्या घरी आली 'आरक्षणा...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com