Pathardi Talathi Bribe Case: लाचखोर महिला तलाठ्यास तीन वर्षे कारावास ; तीन हजारांची घेतली होती लाच

ACB Arrests Talathi Bribe Case: शुभांगी प्रल्हाद ससाणे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
Bribe News :
Bribe News :Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar : वडिलोपार्जित शेतजमिनीचे दोघा भावांच्या नावे वेगळे खातेउतारे करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात महिला तलाठ्यास न्यायालयाने चार वर्षे तुरुंगवासाची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. चिचपूर (ता. पाथर्डी) येथील तलाठी शुभांगी प्रल्हाद ससाणे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. २०१६ मध्ये ही घटना घडली होती.

अहमदनगरमधील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी हा निकाल दिला. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. तक्रारदार पांडुरंग ज्ञानदेव बडे (रा. चिचपूर पांगुळ ता. पाथर्डी) यांच्या वडिलांचे ११ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या नावे असलेल्या जमिनीवर वारस म्हणून तक्रारदार बडे व त्यांचे भाऊ यांची नोंद झाली होती.

Bribe News :
Jagdeep Dhankhad ON Malliakarjun Kharge : 'माझ्या लग्नाला 45 वर्षे झालीत, मला कधीच राग येत नाही' ; असे जगदीप धनखड का म्हणाले..

त्यांच्या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावरही नोंद लागली होती ; मात्र त्यांचे ८ अ हे उतारे वेगवेगळे झाले नव्हते. त्यासाठी या दोघा भावांनी २६ ऑगस्ट २०१६ रोजी तलाठी ससाणे यांच्याकडे ८ अ खाते वेगळे करून देण्याची विनंती केली होती. त्यावर तलाठी ससाणे हिने लाच म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केली. यात तडजोड होऊन तीन हजार रुपये घेण्याचे ठरले होते.

बडे यांनी नगरच्या लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. तेथे त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ससाणे हिला तीन हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून पकडले होते.

Bribe News :
Swabhimani Shetkari Saghtana: राजू शेट्टींचं टेन्शन वाढलं; अनेक शेतकरी नेते बीआरएसच्या गळाला..

पाथर्डी पोलीस ठाण्याला शुभांगी प्रल्हाद ससाणे हिच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. या खटल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात याची सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी चार साक्षीदार न्यायालयापुढे हजर केले. त्यांच्याकडून नोंदविण्यात आलेला साक्षीपुरावा आणि दिवाणे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ससाणे हिला लाच प्रकरणात दोषी ठरविले. न्यायालयाने तिला चार वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com