Ajara Sugar Factory Election: आजरा कारखान्याच्या निवडणुकीत मुश्रीफ की पाटील कोण बाजी मारणार ?

Chandgad Ajara Sugar Factory: आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे असा सामना रंगला.
Hasan Mushrif and MLA Satej Patil
Hasan Mushrif and MLA Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखान्यात एकत्र निवडणूक लढवल्यानंतर आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे असा सामना रंगला आहे.

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघांची मैत्री तुटल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज मतमोजणी होणार असून यात कोण बाजी मारणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजरा साखर कारखान्यासाठी मंगळवारी सकाळी मतमोजणी प्रारंभ झाली. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात झाली. 45 टेबलांवर दोन फेरीत मतमोजणी केली जात आहे. यासाठी 325 कर्मचारी तैनात केले आहेत.

दुपारी 1 वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुजयकुमार येजरे, अमित गराडे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif and MLA Satej Patil
Lok Sabha News : लोकसभेसाठी तळागाळातील भाजप रस्त्यावर, महाविकास आघाडीमध्ये अजूनही नीरव शांतता

आजरा कारखान्यासाठी रविवारी 89 मतदान केंद्रावर सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. अ वर्ग (उत्पादक गट) व ब वर्ग अनुत्पादक गट 32 हजार 739 मतदार आहेत. 19 हजार 866 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 20 जागासाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य आज उघड होणार आहे. भाजप, कॉंग्रेस व सेना प्रणित चाळोबादेव विकास आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी प्रणित श्री रवळनाथ विकास आघाडी मैदानात आहे.

पंधरा दिवस दोन्‍ही आघाड्यांनी जोरदार प्रचारफेऱ्या काढल्या होत्या. सभा, बैठकामधून आरोप-प्रत्यारोप झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदारामध्ये विशेष उत्साह दिसला नाही. चुरशीची निवडणूक झाली नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला आहे. गत निवडणुकीत तो 72 टक्क्यांवर होता. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.

कमी मतदानाचा फटका कोणाला ?

दुपारी बारानंतर निवडणुकीचा कल स्पष्ट होईल. 45 टेबलावर दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी होत आहे. सायंकाळी 4 नंतर निकाल हाती येतील. या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असून, कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Hasan Mushrif and MLA Satej Patil
Hasan Mushrif : केवळ खरडपट्टी नको, हसन मुश्रीफांनी झारीतला शुक्राचार्य बाहेर काढावा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com