Solapur Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ काँग्रेससोबत अजितदादांना जायचंच नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

अजित पवार निधी देताना आमच्यावर अन्याय करतात, असा गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचा सूर होता. त्यावेळी तो मी माध्यमांसमोर मांडला होता. त्यावेळी मी वैयक्तीक दुखणं कधीही मांडलं नाही.
Ajit Pawar-Shahaji Patil
Ajit Pawar-Shahaji PatilSarkarnama
Published on
Updated on

Shahaji Patil On Ajit Pawar : शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत अजित पवार यांना जायचं नव्हतं. ती त्यांची भूमिका होती. पण, शरद पवारसाहेबांच्या हट्टामुळे आणि तीन दिवस समजूत घालून त्यांना परत आणलं गेलं. महाविका आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद अजितदादांनी निराशेतच स्वीकारलं, असे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. (Ajit Dada did not want to go with Uddhav Thackeray and Congress : Shahaji Patil)

आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) निधी देताना आमच्यावर अन्याय करतात, असा गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचा सूर होता. त्यावेळी तो मी माध्यमांसमोर मांडला होता. त्यावेळी मी वैयक्तीक दुखणं कधीही मांडलं नाही. आता परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये दादा रागानं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले आहेत. दादांना ते आवडलं असतं, तर त्यांनी पहाटे शपथविधी कशाला घेतला असता, असा उलटा सवालही त्यांनी केला.

Ajit Pawar-Shahaji Patil
Vikhe Patil Warning : थोरातांच्या गावातून विखेंचा वाळूतस्करांना दणका; प्रवरेतील वाळूउपशाच्या चौकशीचा रोख कोणाकडे?

महाविकास आघाडी सरकार असताना मी अजित पवार यांच्यावर स्पष्टपणे बोललो. पण, त्यांनी माझ्या सांगोला मतदारसंघावर कुठंही अन्याय केलेला नाही. किंबहुना अजितदादांनी माझ्यासाठी थोडं ढळतं माप दिलं. कारण मी पूर्वी २० ते २५ वर्षे पवारांसोबत काम केले आहे. अजित पवारांसोबत आमचा व्यक्तीगत जिव्हाळा आहे. माझ्यावर ते खवळतात, पण दादांचं माझ्यावर प्रेम आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

Ajit Pawar-Shahaji Patil
Sakal-Saam Survey : मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना सर्वाधिक पसंती;पण उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती, दुसऱ्या स्थानावर झेप

भाजपसोबत अजित पवार यांना महाराष्ट्राचा गाडा हाकायचा होता, त्यामुळे ते आता आवडीने शिवसेना-भाजपसोबत आले आहेत. त्यांच्यासोबत आता प्रगल्भ विचाराचे एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे ही त्रिमूर्ती महाराष्ट्राचा चांगली विकास करेल, सरकार व्यवस्थित चालेल, आता कुठेही नाराजी दिसणार नाही, असेही शहाजी पाटील यांनी नमूद केले.

Ajit Pawar-Shahaji Patil
Sakal-Saam survey : भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के लोकांचा कौल; पण अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवार गटाला १५ टक्के जनतेची पसंती

आता तीनही पक्ष अजितदादांचे झालेत

अजित पवार यांची फाईल कुठेही जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मदत करत होते. आता तीनही पक्ष त्यांचे झाले आहेत. या तीनही पक्षातील आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. हे तीनही नेते समर्थपणे आपली भूमिका पार पाडतील, असा आमदार म्हणून मला विश्वास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com