नरेंद्र घुलेंसाठी अजित दादांनी मंत्रालयातील अधिकारी घेतले फैलावर

नेवासे तालुक्यातील काही गावे व शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरेंद्र घुले ( Narendra Ghule ) व त्यांचे बंधू माजी आमदार चंद्रशेखर घुले ( Chandrashekhar Ghule ) यांचे वर्चस्व आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील काही गावे व शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरेंद्र घुले ( Narendra Ghule ) व त्यांचे बंधू माजी आमदार चंद्रशेखर घुले ( Chandrashekhar Ghule ) यांचे वर्चस्व आहे. नरेंद्र घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना एक निवेदन दिले होते. तरीही काम झाले नसल्याने अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतले. ( Ajit Dada took officials from the ministry for Narendra Ghule on the spread )

Ajit Pawar
डॉ. नरेंद्र घुले यांनी मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी मागितला दहा कोटींचा निधी

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावर घुले कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. या कारखान्याच्या डिसलरी संदर्भात नरेंद्र घुले यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना हे काम झाले पाहिजे असे बजावून सांगितले होते. मात्र तरीही हे काम झाले नाही. अखेर नरेंद्र घुले यांनी काल (शनिवारी) पुण्यात जाऊन अजित पवार यांची भेट घेऊन त्या कामाची आठवण करून दिली.

Ajit Pawar
उदयन गडाख व निवेदिता घुले यांचा थाटात झाला साखरपुडा

हे काम झाले नाही याचे अजित पवार यांना ही आश्चर्य वाटले. त्यांनी तातडीने अधिकाऱ्याला फोन लावला. अधिकाऱ्याने सरकारी कारणे देण्यास सुरवात केली. यावर चिडलेल्या अजित दादांनी अधिकाऱ्याला बजावले, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिसलरीला मान्यता देण्याच्या सूजना देऊनही अंमलबजावणी झालेले नाही. माझी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे बैठक होती. तेथे नरेंद्र घुले पाटील मला भेटले. ते मला म्हणाले दादा ते काम झालेले नाही. मी तुम्हाला कागदपत्रे व्हॉट्स अॅप करतो. हे बरोबर नाही, ज्या व्यक्तीने हलगर्जीपणा केलाय त्याला जाब विचारा. त्या खात्याचे सरकार म्हणजे अजित पवार, खात्याचे सचिव. माझ्या मते अजून कोणी आपल्या खात्यात तिसरा नेमलेला नाही. त्यांनी सांगूनही काम असे झाले नाही. हे काम सोमवारी झालेच पाहिजे, असे अजित पवारांनी बजावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com