Ajit Pawar : 'आपला 'हल्लाबोल' मोर्चा बघून सरकार पार हललंचं पाहिजे'

Ajit Pawar : मराठा आंदोलनाचे मोर्चे भव्यदिव्य निघाले. तसेच भव्यदिव्य मोर्चा काढा.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : १७ डिसेंबरला महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मार्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. "आपला मोर्चा बघून हे सरकार हललंच पाहिजे, असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले. अहमदनगर येथे कुकडी सहकारी साखर कारखाना मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Ajit Pawar
Gujrat CM news : ठरलं तर ! भुपेंद्र पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट; नव्या मंत्रिमंडळाची यादीही तयार?

आपल्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चीची जोरदार तयारी करा. शक्य असेल तेवढ्यांनी मुंबईला मोर्चासाठी येण्याचा प्रयत्न करा. आपला मोर्चा बघून हे हे सरकार हललंच पाहिजे. मराठा आंदोलनाचे मोर्चे ज्याप्रमाणे भव्यदिव्य निघाले होते. तसाच भव्यदिव्य मोर्चा काढण्यासाठी आपला सर्वांचा हातभार लागावा, अशी विनंती करतो, असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Aurangabad : जिल्ह्यात चौदा सरपंच अन् ३०८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध..

अनेक शेतकऱ्यांची, गावातल्या सरपंचाची निवदने माझ्याकडे आली आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आवाज उठवण्याचा काम करीन. तुमचा डिंभे-माणिकडोह बोगदा, उन्हाळी आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे काही करता येईल, ते आम्ही करू. विरोधीपक्ष म्हणून आम्ही तसूभरही कमी पडणार नाही, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.

कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम केलं पाहिजे. तुमच्या कामात कसलीही अडचण येऊ न देता, काम करा. श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादीमय करण्यासाठी, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी करण्यासाठी सगळ्यांनी साथ द्या, आशीर्वाद द्या, पाठींबा द्या, असेही अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com