Karmala News अजितदादांची २०१९ मध्ये ऑफर असलेले रामदास झोळ २०२४ मध्ये करमाळ्यातून विधानसभा लढणार

कोणतीही तयारी नसल्यामुळे त्यावेळी मी लढण्यास नकार दिला होता.
 Ramdas Zol
Ramdas ZolSarkarnama
Published on
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २०१९ मध्ये माझ्याशी संपर्क साधून करमाळा (Karmala) मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र, अचानक तयारी होऊ न शकल्याने आपण लढलो नाही. पण. आगामी  २०२४ च्या निवडणुकीत लोकांनी मागणी केली, तर आपण  निवडणूक लढवू, असे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले. (Ajit Pawar had offered to contest from Karmala in 2019: Ramdas Zol)

प्रा. रामदास झोळ यांची भिगवणजवळ दत्तकला शिक्षण संस्था आहे. झोळ हे मूळचे करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचे आहेत. त्यामुळे प्रा. झोळ यांनी आज करमाळ्यात पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीबाबत घोषणा केली.

 Ramdas Zol
Sharad Pawar News : शरद पवार आज का अस्वस्थ आहेत..? खुद्द पवारांनी सांगितले कारण....

प्रा. रामदास झोळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात पंधरा दिवस गेले. राष्ट्रवादीकडून आमदार संजय  शिंदे,  माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी प्रयत्न झाले, त्यानंतर शेवटच्या क्षणी मला लढा असे सांगण्यात आले. मात्र, कोणतीही तयारी नसल्यामुळे त्यावेळी मी लढण्यास नकार दिला होता.

 Ramdas Zol
Market Committee Election : आटपाडीत गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आणि जानकरांच्या रासपची युती ?

सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोठी स्पेस निर्माण झाली आहे. स्वार्थाच्या आणि गटातटाच्या राजकारणामुळे करमाळा तालुका विकासाच्या बाबतीत अतिशय मागे पडला आहे. लोकसभेला राष्ट्रवादीकडून लढलेले आमदार संजय शिंदे इथे अपक्ष लढले, तर शिवसेनेचे विद्यमान आमदार असूनही त्यावेळी नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली होती. यावरून करमाळ्याच्या राजकारणामध्ये प्रचंड अस्थिरता असल्याचे दिसून येते. हीच परिस्थिती आजही कायम आहे, असा दावाही झोळ यांनी केला.

 Ramdas Zol
Nitesh Rane News : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा नार्वेकरांना भेटायचे; मग काँग्रेस आमदारांना : राणेंचा गौप्यस्फोट

ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न रखडलेले अवस्थेत आहेत. शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक क्षेत्रात कोणतीही प्रगती झाली नाही. करमाळा तालुक्याचे विकासाचे मॉडेल निर्माण करण्यासाठी धोरणात्मक आणि रचनात्मक काम झाले नाही. त्यामुळे इथून पुढील काळात चांगल्या विचाराचे लोक बरोबर घेऊन समाजकार्याबरोबर राजकारण करणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जर आमच्या प्रभागातील आरक्षण खुल्या प्रवर्गाचे निघाले तर निश्चितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. रामदास झोळ हे करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील रहिवासी आहेत. पुणे जिल्ह्यातील भिगवणपासून जवळच असलेल्या   दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थेचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com