Karad : अजित पवारांवर काकांचाच विश्वास नाही; जनता कशी विश्वास ठेवणार...

Ajaykumar Mishra मिश्रा म्हणाले, तीन वर्षात ईडीने केलेल्या कारवाईतून देशात तीनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे.
Minister Ajaykumar Mishra
Minister Ajaykumar Mishrasarkarnama
Published on
Updated on

Karad News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार Ajit Pawar यांच्यावर त्यांचे काका शरद पवार यांचाच विश्वास नाही, तर जनता कशी विश्वास ठेवणार. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी Rahul Gandhi यांना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही. देशातील जनता कशी घेणार, अशी टीका केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा Ajaykumar Mishra यांनी आज कराडात केली.

कराड Karad शासकिय विश्रामगृहात मंत्री मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री मिश्रा म्हणाले, राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्याने घेत नाही. कारण त्यांच्याच पक्षातील लोक राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाहीत. तसेच अजित पवार यांनीच दबावतंत्र वापरून विरोधीपक्ष नेतेपद मिळवले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठीही वाटाघाटी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या काकांचाच विश्‍वास त्यांच्यावर राहिला नाही. भारतीय जनता पक्ष साताऱ्यासह सर्व महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा मतदार संघात विश्‍वासपूर्ण संघटन झाले आहे.

Minister Ajaykumar Mishra
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

मिश्रा म्हणाले, तीन वर्षात ईडीने केलेल्या कारवाईतून देशाला तीनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप निराशेच्या भावेतून होत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू, काश्मीरमधील 370 कलम हटविण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांची संख्या कमी झाली असून या ठिकाणी पर्यटनास चालना मिळाली आहे.

Minister Ajaykumar Mishra
Karad : माजी सहकारमंत्र्यांकडुन हसन मुश्रीफांची पाठराखण...

याचबरोबर चीन सीमा भागातही चांगली सुरक्षा यंत्रणा असून एक इंचही चीन अतिक्रमण करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप सतत काम करणार पक्ष आहे. देशातील सर्व धर्मीय लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे लक्ष्य ठेवून पक्ष काम करत आहे. देशाच्या सेवा, सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रश्‍नांवर काम सुरू असल्यामुळेच भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे.

Minister Ajaykumar Mishra
Patan : मंत्री देसाईंची पाटणकरांवर टीका; त्यांनी दुर्गम भाग वंचित ठेवला....

देशांतर्गत समस्या सोडवून जागतिकस्तरावर देशाला समृध्द, शक्तीशाली बनवण्याचे काम भाजप करत आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला आहे. ठाकरेंमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळा आला असून महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला आहे. महाराष्ट्राला यापुढे प्रगतीपथावर नेण्यासाठी काम करणार्‍यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे

Minister Ajaykumar Mishra
Udhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे उरले फक्त तीन मंत्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com