Savta Parishad Support to Ajit Pawar : राज्यातील सावता परिषद अजित पवारांच्या पाठीशी; पंढरपुरात जाहीर केला निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार हेच राज्याचा विकास करू शकतात, असा विश्वास सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : सावता परिषदेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. (Ajit Pawar is supported by Savta Parishad in the state)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन‌ गट पडले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेली आहे. दोन्ही गटाकडून आपल्याच पाठीशी संख्याबळ जमविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटाकडून नेतेमंडळी आणि आमदारांना आपल्या गटाकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे

Ajit Pawar
BJP's Bhiwandi workshop : भाजपचे तीन आमदार लिफ्टमध्ये अडकले; गिरीश महाजन मदतीला आले...

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हेच राज्याचा विकास करू शकतात, असे सांगत बीड येथील सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी राज्यभरातील सावता परिषदेचे हजारो कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Ajit Pawar
Pankaja & Pritam Munde News : मुंडे भगिनींची भाजपच्या राज्यस्तरीय शिबिराला दांडी; राजकीय चर्चांना उधाण...

विठ्ठलाच्या पालखीने आज (गुरुवारी ता. १३ जुलै) अरणकडे संत सावता माळी यांच्या भेटीसाठी प्रस्थान ठेवले. पालखीच्या स्वागतासाठी आखाडे आज पंढरपुरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली व सावता परिषदेची राजकीय भूमिका स्पष्ट केली.

आखाडे यांनी राज्यभरात सावता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे संघटन केले आहे. सावता परिषदेने‌ पाठिंबा जाहीर केल्याने अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीच ताकद निर्णायक ठरणार आहे.

Ajit Pawar
Sushilkumar Shinde on Two DCM : दोन उपमुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे भाष्य....

दरम्यान, शरद पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांना जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. त्यांना त्रास दिला जात आहे. परंतु राज्यातील सर्व ओबीसी समाज छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही आखाडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com