Sushilkumar Shinde on Two DCM : दोन उपमुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे भाष्य....

Deputy Chief Minister Posts: जे घडलं आहे, ते पाहत राहणं ठीक आहे.
Sushilkumar Shinde
Sushilkumar ShindeSarkarnama

Solapur News : सध्या राज्यात जे घडले आहे, त्यावर बोलणे ठीक नाही. मात्र, जे घडलं आहे, ते पाहत राहणं ठीक आहे. ज्या प्रकारे राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत, त्यावरून राज्यात नवीन प्रथा सुरू झाली आहे. मात्र, त्यावरही बघूयात कसं घडतं ते पुढे, असे सांगून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलणं टाळलं. (Congress leader Sushilkumar Shinde's comment on two Deputy Chief Minister posts....)

गांधी फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर छोटसे पण सूचक भाष्य केले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील सहभागाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत विधान केले. नजीकच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Sushilkumar Shinde
Maharashtra Politic's : अमित शहांच्या भेटीनंतर खाते वाटपावर तोडगा....अजित पवार गटाला अर्थ व सहकार मंत्रिपद?

काँग्रेसमध्ये फूट पडणार, अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. त्यावरही शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. काँग्रेस फुटेल, असं मला वाटत नाही. काँग्रेस ही विचाराने पक्की आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही फुटणार नाही. एकदा फुटली ते झाले, आता इथून पुढे काँग्रेसमध्ये काही होणार नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.

Sushilkumar Shinde
BJP's Bhiwandi Workshop : भाजपचा विधानसभेला १५२ प्लसचा नारा; शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार?

शिंदे म्हणाले की, भाजपवाले राज्यातील सरकार कशा पद्धतीने चालवतात, हे पाहण्यासारखे असणार आहे. आता एकदा फुटले आहेत, त्यांना निवडून आणता येणार नाही. निवडणुका आता जवळ येत आहेत. त्यात जनता त्यांना धडा शिकवेल, त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

Sushilkumar Shinde
Madha Lok Sabha Constituency : माढा कोण लढणार? अजित पवारांची राष्ट्रवादी की भाजप?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबाबत मात्र त्यांनी ‘नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स’ असे म्हणत बोलणे टाळले. मंत्रिमंडळ विस्तारावर ते म्हणाले की, जे जे होते, ते बघत राहणे, कशा पद्धतीने हे सरकार तिघे मिळून चालवतात, ते बघूया. जनतेच्या मनात याबद्दल रोष निर्माण होत आहे. आता जर महात्मा गांधी असते तर त्यांनी सर्व बरखास्त करून टाकलं असतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com