Ajit Pawar In Kolhapur : धडकलेल्या 'त्या' गाडीत मी नव्हतोच ! अजितदादांचा तीन दिवसांनंतर खुलासा

Ajit Pawar On Meeting With Sharad Pawar : शरद पवार-अजित पवारांच्या बैठकीने राजकीय चर्चेनंतर महाविकास आघाडीत संभ्रमावस्था
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या उद्घाटनानंतर शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोरेगाव पार्क येथील एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाल्याच्या चर्चा झाली. दरम्यान, उद्योगपतीच्या घरातून बाहेर पडताना गेटला एक वाहन धडकले आणि नंतर थेट निघून गेले. त्या वाहनात अजित पवार झोपून गेल्याची चर्चा माध्यमांत झाली होती. मात्र त्या गाडीत मी नव्हतोच, असा खुलासा अजितदादांनी तीन दिवसांनंतर कोल्हापूर येथे केला आहे. (Latest Political News)

Ajit Pawar
Narendra Modi On Congress : 'राक्षस'चा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार; म्हणाले...

पुण्यातील व्यवसायिक अतुल चोराडीया यांच्या बंगल्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली होती. ही बैठक कौटुंबिक असल्याचे दोन्ही पवारांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगूनही दोघांभोवती उठलेले वादळ काही शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. दरम्यान, अजित पवारांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या बैठक आणि धडकलेल्या वाहनाबाबत माहिती दिली.

चोरडिया यांच्या गेटला बाहेर पडताना एक वाहन धडकले होते. त्यात अजित पवार झोपून गेल्याची चर्चा होती. मात्र त्या गाडीत आपण नव्हतोच, असा खुलासा अजित पवारांनी यावेळी केला आहे. अजित पवार म्हणाले, "पुण्याच्या बैठकीचे काही मनावर घेऊ नका, या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी कुठेही लपून गेलो नव्हतो. चोराडीया आणि आमचे दोन पिढ्याचे नाते आहे. चोराडीया यांनी शरद पवारांना जेवायला बोलावले होते. जयंत पाटीलही त्यांच्यासोबत होते. तेथे आमची भेट झाली. त्याचा राजकीय अर्थ काढू नका", असही अजित पवारांनी सांगितले.

Ajit Pawar
Ajit Pawar In Kolhapur : 'तुला कुणी सांगितलं मला शेंगदाणा चिक्की आवडते?'; दादांच्या प्रश्नाने कार्यकर्ता अवाक..

आम्ही कुटुंबीय प्रत्येक सणाला एकत्र येतो, असे सांगत अजितदादा म्हणाले, "यापुढेही शरद पवारांना भेटलो तर ती भेट कौटुंबिक असेल. दिवाळीला भेटेन, दसऱ्याला भेटेन. कधीही भेटेन, पण ती राजकीय भेट नसून कौटुंबीक असेन", असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. तर मलिकांश बोलण झाले नसल्याचाही त्यांनी यावेळी सांगितले. अजित पवार म्हणाले, "नवाब मलिक यांच्याशी माझे कुठल्याही प्रकारचे बोलणे झालेले नाही. ते आरोग्याच्या मुद्द्यावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत. त्यांना फोनवर बोलता येत नाही."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com