
Sangli News : सांगली जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार ईद्रीस नायकवडी यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान दगडफेक करत अज्ञात पसार झाले आहेत.
आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी हे सांगली जिल्ह्यावर होते.
आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस नायकवडी यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे. रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिस नायकवडी हे दौरा करत आहेत.
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौरा आटपून ते पुढील प्रवासासाठी मिरज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंकी रोडवरून प्रवास करत होते. या प्रवासात असताना जानरावाडी गावाजवळ काही अज्ञात तरुण वाहनाच्या आडवे आले. याच तरुणांनी आमदार नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक केली.
सुदैवाने यात कोण जखमी झालं नाही, मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे. दगडफेक करणारे दोघेजण तिथून पळून गेले. त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
दोन अज्ञात आणि मागून त्यांच्या चार चाकी गाडीवर दगडफेक केली. दगडफेक करणारे दोघेजण अंधाराचा फायदा घेत तिथून पळून गेले. इद्रिस नायकवडी यांच्यारूपाने मिरजेत अल्पसंख्याक नेत्याला पहिल्यांदाच विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
तसेच 1991 पासून मिरजेच्या राजकारणात इद्रिस नायकवडी यांनी सातत्याने दबदबा निर्माण केला. भाषाशैलीमुळे राजकारणात प्रसिद्धी मिळवलेले इलियास नायकवडी हे मिरजेचे शिक्षण मंडळाचे सभापती होते.
महायुती सरकारने सातजणांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर केले. त्यांचा शपथविधी झाला. त्यात माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचा समावेश थोडा धक्कादायक ठरला. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे नाव चर्चेत आले होते, मात्र प्रक्रियाच लांबली होती. आचारसंहिता लागू होण्याआधीचा मुहुर्त सरकारने साधत आणि नायकवडींचे घोडे गंगेत न्हाले.
सांगलीला जिल्ह्याला इद्रिस नायकवडी यांच्या रुपानं बारावा आमदार मिळाला. याआधी आठ विधानसभा आमदारांसह अरुण लाड, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे तीन विधान परिषद सदस्य हे जिल्ह्यातून गेले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.