Ajit Pawar Satara Tour : अजित पवारांचे सातारच्या सीमेवर जंगी स्वागत; गर्दी पाहून धनंजय मुंडे गाडीतच बसले

NCP News : क्रेनच्या साह्याने भला मोठा पुष्पहार आणि डीजे लावून जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले.
Ajit Pawar warm welcome at Satara
Ajit Pawar warm welcome at Satara Sarkarnama

Satara News : उत्तरदायित्व सभेसाठी पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनच्या साह्याने भला मोठा पुष्पहार आणि डीजे लावून जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. स्वागताची गर्दी पाहून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गाडीतून न उतरता आतच बसून राहणे पसंत केले. (Ajit Pawar received a warm welcome at the Satara border)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, वाईचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्वागताला उपस्थित होते. गर्दीमुळे महामार्गावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. स्वागतासाठी उभारलेल्या सभामंडपात सर्व नेते मंडळी उपस्थित होती. पण, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र गाडीतच बसून राहणे पसंत केले.

Ajit Pawar warm welcome at Satara
Cabinet Expansion News : मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्रिपदाचे वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार; सुनील तटकरेंची माहिती

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत अजित पवार यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खंडाळा तालुका येथील सर्वच पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. तसेच, शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व महिलांनी पवार यांचा विशेष सत्कार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीत बसून मकरंद पाटील हे खंडाळा आणि आनेवाडीकडे रवाना झाले.

Ajit Pawar warm welcome at Satara
Vaibhav Patil Join Ajitdada Group : वडील शरद पवारांसोबत, तर पुत्राने धरली अजितदादा गटाची वाट..!

उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने शिरवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र, अजित पवार यांचे आगमन झाल्यावर गर्दीवर नियंत्रण मिळवता मिळवता पोलिसांची दमछाक झाली. अनेक लोकांनी या वेळी पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच धाव घेतली. यानंतर शिरवळ आणि खंडाळा येथेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते आनेवाडीकडे रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com